Matthew 5

मत्तय 05 सामान्य नोंदी

रचना आणि स्वरूप

बरेच लोक मत्तय 5-7 अध्यायामधील वचनांना डोंगरावरील प्रवचन म्हणतात. हे येशूने शिकवलेला सर्वात मोठा धडा आहे. पवित्र शास्त्रामधील हा पाठ तीन अध्यायामध्ये विभागतो, परुंतु कधीकधी वाचक गोंधळात पडू शकतात. जर आपले भाषांतर अध्यायाचे विभागामध्ये विभाजन करत असेल, तर वाचकांना हे समजेल की संपूर्ण प्रवचन एक मोठा विभाग आहे .

मत्तय 5:3-10, या वचनांना धन्यवाद किंवा आशीर्वाद म्हणून ओळखले जाते,उर्वरित मजकुरापेक्षा पृष्ठाच्या उजव्या बाजूस उजवीकडे रचले जाते,प्रत्येक ओळ जिची सुरवात “आशीर्वादित” या शब्दाने होते.या पृष्ठावरील, शब्द ठेवण्याचा हा मार्ग या शिकवणीचा काव्यात्मक स्वरूपावर प्रकाश टाकतो.

या प्रवचनातील अनेक भिन्न विषयाबद्दल येशू बोलला, म्हणून जेव्हा जेव्हा येशूने हा विषय बदलला तेव्हा आपण वाचकांना अध्यायामध्ये एक रिक्त ओळ ठेवून मदत करू शकतो.

या अध्यायातील विशेष संकल्पना

“त्याचे शिष्य”

अनुयायी किंवा शिष्य म्हणून येशूचे अनुसरण करणाऱ्या कोणाचाही उल्लेख करणे शक्य आहे. येशूने आपल्या अनुयायांपैकी बारा अनुयायांची जवळचे “बारा शिष्य” म्हणून निवडले नंतर त्यांना प्रेषित म्हणून ओळखले जाऊ लागले.

Matthew 5:1

General Information:

3 वचनामध्ये, येशू जे लोक आशीर्वादित आहेत त्यांच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करण्यास सुरुवात करतो.

Connecting Statement:

ही कथेमधील नवीन भागाची सुरुवात आहे ज्यामध्ये येशू त्याच्या शिष्यांना शिक्षण देण्यास सुरुवात करतो. हा भाग अध्याय 7 च्या शेवटी संपतो आणि त्याला डोंगरावरील प्रवचन म्हटले जाते.

Matthew 5:2

He opened his mouth

हे एक बोलणे आहे: वैकल्पिक भाषांतर: “येशू बोलू लागला “(पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-idiom)

taught them

“त्यांना “हा शब्द त्याचा शिष्यांना दर्शवतो.

Matthew 5:3

the poor in spirit

ह्याचा अर्थ असा आहे की जो नम्र आहे. वैकल्पिक भाषांतर: “ज्यांना ठाऊक आहे की त्यांना देवाची गरज आहे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-idiom)

for theirs is the kingdom of heaven

येथे “स्वर्गाचे राज्य” हे देवाच्या शासनाचा राजा म्हणून दर्शवते. हे वाक्य केवळ मत्तयच्या पुस्तकात आहे. शक्य असेल तर, आपण आपल्या भाषेमध्ये “स्वर्ग” असेच ठेवा. वैकल्पिक भाषांतर: “स्वर्गातील देव त्यांचा राजा होईल” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

Matthew 5:4

those who mourn

दुखी होण्याचे संभाव्य कारण म्हणजे 1)जगाचा पापी स्वभाव किंवा 2) त्यांची स्वतःची पापे किंवा 3) एखाद्याचा मृत्यू. तुमच्या भाषेमध्ये शोक करण्याकरिता आवश्यकता नसते तो पर्यंत निर्देश करू नये.

they will be comforted

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देव त्यांना सांत्वन देईल” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 5:5

the meek

सौम्य किंवा “जो त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून नाही”

they will inherit the earth

देव त्यांना संपूर्ण पृथ्वी देईल

Matthew 5:6

those who hunger and thirst for righteousness

हे रूपक जे लोक योग्य ते करण्यास उत्सुक आहेत त्या लोकांचे वर्णन करतो. वैकल्पिक भाषांतर: “जे लोक खाण्या पिण्याची जेवढी इच्छा करतात तेवढेच त्यांना सत्यात जगणे आवडते” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

they will be filled

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देव त्यांना भरेल” किंवा “देव त्यांना तृप्त करेल” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 5:8

the pure in heart

ज्या लोकांची अंतःकरणे शुद्ध आहेत. येथे “हृदय” हे एक मनुष्याचे अंतरिक अस्तित्व किंवा उद्देश यासाठी रूपक आहे. वैकल्पिक भाषांतर: “ज्यांना केवळ देवाची सेवा करायची आहे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

they will see God

येथे “पहाणे” म्हणजे ते देवाच्या उपस्थितीत राहण्यास सक्षम असतील. वैकल्पिक भाषांतर: “देव त्यांना त्यांच्या बरोबर राहण्यास परवानगी देईल”

Matthew 5:9

the peacemakers

हे असे लोक आहेत जे एकमेकांना शांततेत राहण्यास मदत करतात.

for they will be called sons of God

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देव त्यांना त्याची मुले म्हणेल” किंवा “ते देवाची मुले होतील” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

sons of God

“मुले” या शब्दाचा अनुवाद करणे सर्वोत्तम आहे म्हणजे आपली भाषा नैसर्गिकरीत्या मानवी मुलगा किंवा मूल यास संदर्भ देण्यासाठी वापरली जाते.

Matthew 5:10

those who have been persecuted

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “ते लोक ज्यांना इतर चुकीची वागणुक देतात” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

for righteousness' sake

कारण त्यांनी जे करावे अशी देवाची इच्छा आहे ते तसेच करतात

theirs is the kingdom of heaven

येथे “स्वर्गाचे राज्य” हे देव त्याच्या शासनाचा राजा असल्याचे दर्शवते. हे वाक्य केवळ मत्तयच्या पुस्तकात आहे. शक्य असेल तर, आपल्या भाषेत “स्वर्ग” असेच ठेवा. पहा मत्तय 5:3 मध्ये तूम्ही कसे भाषांतर केले आहे. वैकल्पिक भाषांतर: “स्वर्गातील देव त्यांचा राजा होईल” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

Matthew 5:11

Connecting Statement:

येशूने आशीर्वादित असलेल्या लोकांच्या गुणधर्माचे वर्णन करणे संपवले.

Blessed are you

शब्द “तूम्ही” हा बहुवचनी आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

say all kinds of evil things against you falsely

सर्व प्रकारचे वाईट तुमच्या विषयी बोलतात किंवा “तुमच्या बद्दल वाईट गोष्टी बोलतात की जे सत्य नाहीत”

for my sake

कारण तूम्ही माझे अनुसरण करता किंवा माझ्यावर विश्वास ठेवता”

Matthew 5:12

Rejoice and be very glad

आनंद करा आणि “खुप उल्लास करा” याचा अर्थ जवळपास समान गोष्ट आहे. आपल्या ऐकणाऱ्यांना फक्त आनंदाने नव्हे तर शक्य असल्यास आनंद करण्यापेक्षा ही जास्त गोष्टी करायला पाहिजे अशी येशूची इच्छा होती. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-doublet)

Matthew 5:13

Connecting Statement:

येशू हे शिकवायला सुरवात करतो की त्याचे शिष्य कशा प्रकारे मीठ आणि प्रकाश आहेत.

You are the salt of the earth

संभाव्य अर्थ असे आहेत 1) जसे मीठ अन्न चांगले बनवते, तसे येशूचे शिष्य जगाच्या लोकांना प्रभावित करतात जेणेकरून ते चांगले होतील. वैकल्पिक भाषांतर: “तूम्ही जगातील लोकासाठी मीठाप्रमाणे आहात” किंवा 2) जसे मीठ अन्न सुरक्षित ठेवते, तसे येशूचे शिष्य लोकांना भ्रष्ट होण्यापासून राखतात. वैकल्पिक भाषांतर: “जसे मीठ अन्नासाठी आहे, तसे तूम्ही जगासाठी आहात” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

if the salt has lost its taste

संभाव्य अर्थ म्हणजे 1) “मीठ जी गोष्ट करते ते करण्याचे सामर्थ्य जर मीठाने गमावले तर” किंवा 2) “जर मिठाने त्याचा खारटपणा गमावला असेल तर”. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

how can it be made salty again?

पुन्हा तो कसा उपयोगी ठरू शकतो? शिष्यांना शिकवण्यासाठी येशूने एक प्रश्न वापरला आहे. वैकल्पिक भाषांतर: “ते उपयुक्त बनवण्याचा कोणताही मार्ग नाही” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

except to be thrown out and trampled under people's feet

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “लोकांनी ते रस्त्यावर फेकणे आणि त्यावर चालणे वगळता” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 5:14

You are the light of the world

याचा अर्थ येशूचे अनुयायी देवाला ओळखत नाहीत अशा लोकांना देवाच्या सत्याचा संदेश आणतात. वैकल्पिक भाषांतर : “तूम्ही जगाच्या लोकांसाठी प्रकाश आहात” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

A city set on a hill cannot be hidden

रात्री जेव्हा काळोख आहे, लोक शहरातील दिवे चमकलेले पाहू शकतात. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “रात्रीच्या दरम्यान, शहरातील चमकणाऱ्या प्रकाशाला कोणीही लपवू शकत नाही” किंवा “प्रत्येकाला शहरातील दिवे डोंगरावर दिसतात” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 5:15

Neither do people light a lamp

लोक दिवा लावून ठेवत नाहीत

put it under a basket

दिवा लावून टोपलीच्या खाली ठेवतात.हे फक्त लपविण्यासाठी प्रकाश करणे मूर्खपणाचे आहे जेणे करून लोकानी दिव्याचा प्रकाश पाहू नये.

Matthew 5:16

Let your light shine before people

याचा अर्थ येशूचे शिष्य अशा प्रकारे जगले पाहिजे की इतर लोक देवाच्या सत्याबद्दल शिकतील. वैकल्पिक भाषातर: “आपले जीवन लोकासमोर चमकत असलेल्या प्रकाशाप्रमाणे असावे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

your Father who is in heaven

“पिता” या शब्दाचे भाषांतर आपल्या भाषेत करणे चांगले आहे जे नैसर्गिकरित्या मानवी पित्याला दर्शविते.

Matthew 5:17

Connecting Statement:

जुन्या करारातील नियमांची पूर्णता कश्याप्रकारे करण्यासाठी तो आला आहे हे शिकविण्यास येशूने सुरुवात केली.

the prophets

हे शास्त्र वचनामध्ये संदेष्ट्यानी जे काही लिहिले त्याला संदर्भित करते. .( पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

Matthew 5:18

truly I say to you

मी तुम्हास सत्य सांगतो. हे वाक्य येशू पुढे जे सांगत आहे त्यावर जोर देते.

until heaven and earth pass away

येथे “स्वर्ग” आणि “पृथ्वी” संपूर्ण विश्वाला दर्शवतात. वैकल्पिक भाषांतर: “जोपर्यंत विश्व टिकून आहे तोपर्यंत “(पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-merism)

not one jot or one tittle

“काना” हे सर्वात लहान इब्री अक्षर होते, आणि अनुस्वार हे छोटेसे चिन्ह होते जे दोन इब्री अक्षरामधील फरक होता. वैकल्पिक भाषांतर: “अगदी लहान लिखित अक्षर किंवा शब्दाचा सर्वात लहान भाग” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

all things have been accomplished

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “सर्व काही घडले आहे” किंवा” देव सर्व गोष्टी घडवून आणतो” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

all things

“सर्व गोष्टी” हा शब्द नियमशास्त्रातील सर्वकाही दर्शवतो. वैकल्पिक भाषांतर: “नियमशास्त्रातील सर्वकाही” किंवा “नियमशास्त्रामधील लिहिलेले सर्वकाही” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

Matthew 5:19

whoever breaks

जो कोणी अवज्ञा करतो किंवा जो कोणी दुर्लक्ष करतो

the least one of these commandments

या आज्ञामधील कोणतीही आज्ञा, अगदी कमी महत्वाची सुद्धा

whoever ... teaches others to do so will be called

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जर कोणी इतरांना असे करण्यास शिकवतो, देव त्या व्यक्तीस बोलावेल” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

least in the kingdom of heaven

“स्वर्गाचे राज्य” हे वाक्य देव शासनकर्ता राजा आहे हे दर्शवते. हे वाक्य केवळ मत्तयमध्ये आढळते. शक्य असेल तर आपल्या भाषेत “स्वर्ग” वापरा. वैकल्पिक भाषांतर: “स्वर्गीय राज्यात सर्वात कमी महत्वपूर्ण” किंवा ”स्वर्गातील देवाच्या शासनाधीन असलेले सर्वात कमी महत्वाचे असलेले” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

keeps them and teaches them

सर्व आज्ञा पाळतो आणि इतरांना आज्ञापालन शिकवतो

great

खूप महत्वाची

Matthew 5:20

For I say to you

पुढे येशू काय म्हणतो त्यावर हे भर देते,

you ... your ... you

हे सर्व अनेकवचनी आहे (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

that unless your righteousness exceeds ... Pharisees, you will in no way enter

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “आपल्या धार्मिकतेपेक्षा जास्त असणे आवशक आहे ...परुश्यांना प्रवेश करण्यासाठी” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-doublenegatives)

Matthew 5:21

General Information:

येशू अशा लोकांच्या गटाशी बोलत आहे ज्यांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये. “मी तुम्हास सांगतो” किंवा “तूम्ही ऐकले आहे” यामध्ये “तूम्ही” अनेक वचन आहे. “तूम्ही” हा शब्द “मारु नका” यामध्ये एकवचन आहे, पण काही भाषांमध्ये त्याला अनेकवचन असणे आवशक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

Connecting Statement:

जुना करार पूर्ण करण्यास येशू आला आहे हे तो शिकवण्यास सुरवात करतो. येथे तो खून आणि क्रोधाबद्दल बोलू लागतो.

it was said to them in ancient times

हे कर्तरी क्रियासह व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “पूर्वी जे राहत होते त्यास देव म्हणाला” किंवा “मोशे आपल्या पूर्वजांना खूप पूर्वी म्हणाला” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Whoever kills will be in danger of the judgment

येथे “न्याय” हा शब्द न्यायाधीश एखादया व्यक्तीस मारणार आहे हे सुचवते. वैकल्पिक भाषांतर: “दुसऱ्या व्यक्तीस मारणाऱ्या मनुष्याला न्यायाधीश दोषी ठरवतो” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

kill ... kills

हा शब्द खुनास दर्शवितो, प्रत्येक प्रकारच्या हत्याकांडाला नाही.

will be in danger of the judgment

येशू मानवी न्यायाधीशाचा संदर्भ देत नाही तर आपल्या भावावर संतप्त झालेल्या व्यक्तीचा निषेध करणाऱ्या देवाला दर्शवतो. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

Matthew 5:22

But I say

येशू देव आणि त्याच्या शब्दाशी सहमत होता, पण धार्मिक पुढाऱ्यानी देवाच्या वाचनाचा ज्या मार्गाने अवलंब केला त्याच्याशी सहमत नाही. “मी” हे परिणामकारक आहे. हे दर्शवते की, जे काही येशू म्हणत आहे ते देवाकडून आलेल्या मूळ आज्ञांना समान महत्व आहे. या वाक्याचा अशाप्रकारे अनुवाद करण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये जोर दर्शवतो.

brother

हे सहकारी विश्वासणाऱ्याना दर्शवते, एका बांधवाला किंवा शेजाऱ्याला नाही.

worthless person ... fool

जे योग्यरीत्या विचार करू शकत नाहीत अशा लोकासाठी अपमान आहे. “अयोग्य व्यक्ती” जवळजवळ “बुद्धिहीन” आहे, जेथे “मूर्ख” देवाकडे अवज्ञा करण्याच्या कल्पना जोडतो.

council

हे कदाचित स्थानिक परिषदे सारखे होते, यरुशलेम मधील मुख्य धर्मसभा नाही.

Matthew 5:23

you

अशा लोकांच्या गटानी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू बोलत आहे. “तूम्ही” आणि “तुमचे” या सर्व घटना एकवचनी आहेत, पण काही भाष्यामध्ये ते बहुवचनी असणे गरजेचे आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

offering your gift

आपल्या भेटवस्तू देणे किंवा “भेटवस्तू आणणे”

at the altar

ते हे सुचित करते की यरुशलेमच्या मंदिरामध्ये ही देवाची वेदी आहे. वैकल्पिक भाषांतर: “मंदिरातील देवाच्या वेदीसाठी” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

there remember

जेव्हा तूम्ही वेदी समोर उभे असता तुम्हाला आठवते

your brother has anything against you

तूम्ही काही तरी केले आहे म्हणून दुसरा व्यक्ती तुमच्याशी रागावलेला आहे

Matthew 5:24

First be reconciled with your brother

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “प्रथम त्या व्यक्तीबरोबर समेट कर” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 5:25

Agree with your

अशा लोकांच्या गटांनी वैयक्तीकरित्या काय करावे आणि काय करू नये या विषयी येशू बोलत आहे. “तूम्ही” आणि “तुमचे” या घटना एकवचनी आहेत, पण काही भाषांमध्ये त्यांना अनेकवचन असणे गरजेचे आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

your accuser

हा असा व्यक्ती आहे जो दुसऱ्याने काहीतरी चुकीचे करण्यावर दोषी ठरवत आहे. तो चुकीचे करणाऱ्याला न्यायालयात नेऊन त्याचा न्याय होण्यासाठी दोष लावतो.

may hand you over to the judge

येथे “हाती देईल” म्हणजे एखादयाला दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली देणे. वैकल्पिक भाषांतर: “न्यायाधीशाला त्याच्याशी सौदा करू द्या” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-idiom)

the judge may hand you over to the officer

येथे “ हाती देईल” म्हणजे एका व्यक्तीला दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली देणे. वैकल्पिक भाषांतर: “न्यायाधीश तुला अधिकाऱ्याकडे देईल” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-idiom)

officer

ज्याच्याकडे न्यायाधीशाचा निर्णय देण्याचा अधिकार आहे असा व्यक्ती

you may be thrown into prison

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “अधिकारी तुला तुरुंगात टाकू शकेल” "" (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 5:26

Truly I say to you

मी तुम्हाला सत्य सांगतो. या वाक्यात येशू पुढे काय म्हणणार आहे यावर जोर टाकण्यात आला आहे.

from there

तुरुंगातून

Matthew 5:27

General Information:

अशा लोकांच्या गटांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू बोलत आहे. “तूम्ही ऐकले आहे” आणि “मी तुम्हास सांगतो” मध्ये ‘तूम्ही” अनेकवचन आहे. “व्यभिचार करू नको” मध्ये “तूम्ही” हे समजू शकता, पण काही भाषांमध्ये त्याला अनेकवचन असणे गरजेचे आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

Connecting Statement:

येशू जुन्या कराराची पूर्णता करण्यासाठी कसा आला याबद्दल शिकवत आहे. येथे व्यभिचार आणि वासना याविषयी शिकविण्यास सुरवात करतो.

that it was said

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देवाने म्हटले आहे’ किंवा “मोशेने म्हटले आहे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

commit

या शब्दाचा अर्थ म्हणजे क्रिया करणे किंवा काहीतरी करणे.

Matthew 5:28

But I say

येशू देवाशी आणि त्याच्या शब्दाशी सहमत होता, पण धार्मिक नेत्यांनी देवाच्या वचनाचे ज्याप्रकारे लागूकरण केले त्याच्याशी तो सहमत नव्हता “मी” हा शब्द प्रभावी आहे. यावरून हे समजते की येशू जे म्हणत आहे त्या देवाच्या मूळ आज्ञांना समान महत्व आहे. हे जोर दर्शवते अशा प्रकारे या वाक्यांशाचा अनुवाद करण्याचा प्रयत्न करा. पहा तूम्ही मत्तय 5:22. मध्ये कसे भाषांतर केले आहे.

everyone who looks on a woman to lust after her has already committed adultery with her in his heart

हे रूपक असे दर्शवते की एक व्यक्ती स्त्री कडे वासनेने पाहतो तर तो व्यक्ती व्यभिचाराची कृती करणाऱ्या व्यक्ती प्रमाणे दोषी आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

to lust after her

तिच्या कडे वासनेने पाहतो किंवा “तिच्या सोबत झोपण्याची इच्छा आहे”

in his heart

येथे “हृदय” हे एका व्यक्तीच्या विचरांसाठी रूपक आहे. वैकल्पिक भाषांतर: “त्याच्या मनामध्ये” किंवा “त्याच्या विचारांमध्ये” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

Matthew 5:29

If your

अशा लोकांच्या गटानी वैयक्तिकरीत्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू बोलत आहे. सर्व उदाहरणातील “तू” आणि “तूम्ही” एकवचनी आहेत, पण काही भाष्यांमध्ये त्यांना अनेकवचन असणे गरजेचे आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

If your right eye causes you to stumble

येथे “डोळा” एखाद्या व्यक्तीला काय दिसते ते सांगतो. आणि, “ठेच” हे “पापाचे” रूपक आहे. वैकल्पिक भाषांतर: “तूम्ही जे काही पाहता ते तुम्हाला अडखळण बनते” किंवा “जे काही तूम्ही पाहता कारण तूम्ही पाप करता” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy आणि/WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

right eye

याचा अर्थ सर्वात महत्वाचा डोळा, डाव्या डोळ्याच्या विरुद्ध आहे. तुम्हाला “योग्य” “चांगले” किंवा “उत्तम” असे अनुवाद करण्याची गरज आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-idiom)

pluck it out

एखाद्याने पाप करण्याचे थांबवण्याकरिता जे काही केले पाहिजे ते करणे ही एक आज्ञा आहे. याचा अर्थ “ते जबरदस्तीने काढणे” किंवा “नष्ट करणे”. जर उजवा डोळा विशेषतः नमूद केलेला नसेल तर आम्हाला “आपले डोळे नष्ट कर” असे भाषांतर करावे लागेल. जर डोळे नमूद केले असतील तर आपल्याला “त्यांचा नाश कर” असे भाषांतर करावे लागेल. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-hyperbole)

throw it away from you

त्यातून सुटका करा

one of your body parts should perish

तुम्हाला तुमचा शरीरातील एक भाग गमवावा लागेल

than that your whole body should be thrown into hell

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “की देवाने तुमचे पूर्ण शरीर नरकात फेकून द्यावे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 5:30

If your right hand causes

या उल्लेखामध्ये, हात हा संपूर्ण व्यक्तीच्या कृतींना दर्शवतो. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

right hand

याचा अर्थ सर्वात महत्वाचा हात डाव्या हाताच्या विरोधात आहे . तुम्हाला “योग्य” “चांगले” किंवा “मजबूत” असे भाषांतर करणे गरजेचे आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-idiom)

cut it off

एका व्यक्तीस पाप करणे थांबवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीसाठी एक आज्ञा आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-hyperbole)

Matthew 5:31

Connecting Statement:

येशू जुन्या कराराची पूर्णता करण्यास कसा आला आहे हे तो सातत्याने शिकवतो. येथे तो सूटपत्राबद्दल शिकवण्यास सुरुवात करतो.

It was also said

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देव हे देखिल म्हणाला” किंवा “मोशे देखील म्हणाला” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

sends his wife away

सूटपत्राविषयी सौम्य शब्दात सांगणे (पहा : /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-euphemism)

let him give

त्याने दिलेच पाहिजे

Matthew 5:32

But I say

येशू देवाशी आणि त्याच्या वचनाशी सहमत होता, परंतु धार्मिक पुढाऱ्यांनी ज्या प्रकारे देवाच्या वचनाचे लागूकरण केले त्याबद्दल तो सहमत नव्हता. “मी” हा शब्द परिणामकारक आहे. या वरून हे दर्शवते की येशूने जे म्हटले ते देवाच्या आज्ञा प्रमाणेच महत्वाचे आहे. या वाक्याचा अशा प्रकारे अनुवाद करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तेथे जोर दर्शविला जातो. पहा तूम्ही मत्तय 5:22 मध्ये कसे भाषांतर केले आहे.

makes her an adulteress

जो मनुष्य एका स्त्रीला अयोग्य प्रकारे सूटपत्र देतो “तो त्या स्त्रीला व्यभिचार करण्यास कारण ठरतो”. पुष्कळ संस्कृतीमध्ये तिचा पुनर्विवाह होणे सामान्य गोष्ट आहे, पण सूटपत्र अयोग्य असेल तर, अशा रीतीने विवाह करणे व्यभिचार होय.

her after she has been divorced

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “तिच्या पती नंतर तिचे सूटपत्र झाले असेल” किंवा “सूटपत्र झालेली स्त्री” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 5:33

General Information:

अशा लोकांच्या गटांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू बोलत आहे. “तूम्ही ऐकले आहे” आणि “मी तुम्हास सांगतो” या मध्ये तूम्ही हे अनेकवचन आहे . “तू” आणि “तुमचे” हे शब्द “शपथ वाहू नका” आणि “आपल्या शपथा वाहून” या मध्ये एकवचन आहे पण काही भाषामध्ये त्यांना अनेकवचन असणे गरजेचे आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

Connecting Statement:

येशू जुन्या कराराची पूर्तता करण्यास कसा आला या बद्दल शिकवत आहे. येथे तो शपथ घेण्याबद्दल बोलण्यास प्रारंभ करतो.

Again, you

तरीसुद्धा, तू किंवा “येथे दुसरे उदाहरण आहे. तूम्ही”

it was said to those in ancient times

हे कर्तरी क्रियापदसह व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देव बऱ्याच काळापूर्वी राहिलेल्यांना म्हणाला” किंवा “मोशेने बऱ्याच काळापूर्वी राहिलेल्या पूर्वजांना म्हणाला” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Do not swear a false oath, but carry out your oaths to the Lord.

तूम्ही काहीतरी कराल अशी शपथ वाहू नका आणि नंतर ती तूम्ही पूर्ण करणार नाही. त्याऐवजी तूम्ही जे काही प्रभूसाठी कराल अशी परमेश्वराला शपथ वाहिली असेल ती पूर्ण करा.

Matthew 5:34

But I say

येशू देवाशी आणि त्याचा वचनाशी सहमत आहे, पण धार्मिक पुढाऱ्यांनी देवाच्या वचनाचे ज्याप्रकारे लागूकरण केले त्याच्याशी तो सहमत नव्हता. “मी” हा शब्द परिणामकारक आहे. या वरून हे सूचित होते की येशू जे म्हणतो त्याचे देखिल देवाच्या मूळ आज्ञा समान महत्व आहे. या वाक्याचा अशा प्रकारे अनुवाद करण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये जोर दर्शवतो. पहा तूम्ही मत्तय 5:22 मध्ये कसे भाषांतर केले आहे.

swear not at all

शपथ वाहूच नका किंवा “कोणत्याही गोष्टीची शपथ वाहू नका”

it is the throne of God

कारण देव स्वर्गातून राज्य करतो, येशू स्वर्गाविषयी बोलतो जसे ते एक सिंहासन आहे. वैकल्पिक भाषांतर: “येथून देव राज्य करतो” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

Matthew 5:35

Connecting Statement:

येशू वचन 34 पासून त्याचे शब्द सांगण्याचे पूर्ण करतो की लोकांनी शपथ वाहू नये.

nor by the earth ... city of the great King

येथे येशूच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा लोक वचन देतात किंवा ते म्हणतात एखादी गोष्ट खरी आहे, तेव्हा त्यांनी त्याविषयी शपथ वाहू नये.काहीं लोक असे शिकवत होते की जर एकादी व्यक्ती देवाची शपथ घेते की तो काहीतरी करेल तर त्याने ते केले पाहिजे,परंतु जर त्याने स्वर्ग किंवा पृथ्वी अशा इतर गोष्टींची शपथ घेतली तर तो जे काही करत नाही ते कमी धोक्याचे आहे. येशू म्हणतो की स्वर्ग किंवा पृथ्वी किंवा यरुशलेमेची शपथ वाहने हे देवाची शपथ वाहण्यासारखे गंभीर आहे कारण त्यासर्व गोष्टी देवाच्या आहेत.

it is the footstool for his feet

या रूपकाचा अर्थ म्हणजे पृथ्वीदेखील देवाच्या मालकीची आहे. वैकल्पिक भाषांतर: “ते पदासनासारखे आहे जिथे राजा आपले पाय ठेवतो” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

for it is the city of the great King

हे शहर देवाच्या मालकीचे आहे, महान राजा

Matthew 5:36

General Information:

आधी येशूने आपल्या ऐकणाऱ्यांना सांगितले की देवाचे सिंहासन, पदासन आणि पृथ्वीवरील घर हे शपथ घेण्यासाठी नाहीत. येथे तो म्हणतो की ते त्यांच्या डोक्याची देखील शपथ घेऊ शकत नाहीत.

your ... you

अशा लोकांच्या गटाशी येशू बोलत आहे ज्यांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये या विषयी बोलत आहे. या शब्दांचा सर्व उल्लेख एकवचनी आहे,पण काही भाषांमध्ये त्यांना अनेकवचन असणे गरजेचे आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

swear

हे शपथ घेण्याविषयी आहे. पहा तूम्ही मत्तय 5:34 मध्ये कसे भाषातर केले आहे.

Matthew 5:37

let your speech be 'Yes, yes,' or 'No, no.'

जर तुम्हाला “होय” म्हणायचे असेल तर “होय” म्हणा आणि “नाही” म्हणायचे असेल तर “नाही” म्हणा.

Matthew 5:38

General Information:

लोकांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये त्याबद्दल येशू लोकांच्या एका गटाशी बोलत आहे. शब्द “तूम्ही” हा “तूम्ही ऐकले आहे” आणि “मी तुम्हास सांगतो” यामध्ये अनेकवचन आहे. “तूम्ही” हा शब्द “जो कोणी तुला मारेल” आणि “ त्याच्या कडे वळ” या दोन्ही मध्ये एकवचनी आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

Connecting Statement:

येशू कशा प्रकारे तो जुना करार पूर्ण करण्यास आला आहे हे शिक्षण देण्याचे सुरु ठेवतो. येथे तो एखाद्या शत्रूविरुद्ध सूड उगवण्याविषयी बोलण्यास सुरु करतो.

that it was said

हे कर्तरी स्वरुपात नमूद केले जाऊ शकते. पहा तूम्ही मत्तय 5:27 मध्ये कसे भाषांतरित केले आहे. वैकल्पिक भाषांतर: “की देव म्हणाला” किंवा “मोशे म्हणाला” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

eye for an eye, and a tooth for a tooth

मोशेच्या नियमशास्त्रात एका व्यक्तीला एखादया व्यक्तीने हानी पोहोचाविली असेल तर त्याचप्रकारे त्याला हानी पोहोचवावी, पण त्याच्या पेक्षा जास्त वाईट हानी पोहोचवू नये.

Matthew 5:39

But I say

येशू देव आणि त्याच्या वचनाशी सहमत होता पण धार्मिक पुढाऱ्यांनी ज्याप्रकारे वचनाचे लागूकरण केले त्याशी तो असहमत होता. शब्द “मी” हा परिणामकारक आहे. यावरून हे स्पष्ट होते की येशू जे म्हणतो ते देवाच्या मूळ आज्ञासारखेच महत्वपूर्ण आहे. या वाक्याचे भाषांतर अशा प्रकारे केले पाहिजे ज्याने जोर दर्शविला जातो.

one who is evil

दुष्ट वक्ती किंवा “जो तुम्हाला हानिकारक आहे”

strikes ... your right cheek

येशूच्या संस्कृतीमध्ये एका माणसाच्या गालामध्ये मारणे म्हणजे अपमान होता. डोळा आणि हाताप्रमाणे उजवा गाल अधिक महत्वाचा आहे, आणि त्या गालावर मारणे भयंकर अपमान होता.

strikes

खुल्या हाताच्या मागच्या बाजूने मारणे

turn to him the other also

त्याला तुमच्या दुसऱ्या गालावर पण मारू द्या

Matthew 5:40

General Information:

लोकांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये या विषयी येशू लोकांचा गटाशी बोलत आहे.”तूम्ही” आणि “तुमचे” या शब्दाची घटना एकवचनी आहे. “तूम्ही” हा शब्द आज्ञेमध्ये “जा” “द्या”,आणि “दूर जाऊ नका”. काही भाषांमध्ये त्यांना अनेकवचन असण्याची आवश्यकता असू शकते. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

coat ... cloak

“बंडी” ही शरीराच्या जवळ जड शर्ट किंवा स्वेटर सारखे घातले जात होते. “अंगरखा” हा दोघांमध्ये महत्वपूर्ण आहे,जो बंडीवरती उबदारपणासाठी तसेच रात्रीच्या समई पांघरून म्हणून वापरला जात होता.

let that person also have

त्या व्यक्तीसही ते द्या

Matthew 5:41

Whoever

जो कोणी. संदर्भ हे सुचित करते की तो रोमी सैनिकाबद्दल बोलत आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

one mile

हे एक हजार पाऊल आहे, जे रोमन सैनिकाने त्याच्यासाठी एखाद्याला काहीतरी आणण्यासाठी कायदेशीररीत्या आग्रहाने पाठवू शकतो. जर “मैल” हा शब्द गोंधळात पाडणारा असेल तर एक किलोमीटर किंवा अंतर असे भाषांतर केले जाऊ शकते.

with him

हे आपल्याला जाण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्तीला दर्शविते

go with him two

तो तुला जेवढा मैल जाण्यास भाग पाडतो तेवढा जा, आणि आणखी दुसरा मैल जा. जर “मैल” हे गोंधळात पाडणारे असेल तर तूम्ही “दोन किलोमीटर” किंवा “दुप्पट पर्यंत” असे भाषांतर करू शकता.

Matthew 5:42

do not turn away from

कर्ज देणे नकारू नको. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषातर: “उधार देणे”

Matthew 5:43

General Information:

लोकांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये या विषयी येशू लोकांच्या एका गटांशी बोलत आहे. शब्द “तूम्ही” हा “तूम्ही ऐकले आहे” आणि “मी तुम्हाला सांगतो” यामध्ये अनेकवचने आहेत. शब्द “तूम्ही” आणि “तुमचे” हे “तूम्ही तुमच्या शेजाऱ्यावरती प्रीती करावी आणि शत्रूचा द्वेष करावा”, या मध्ये एकवचनी आहे. पण काही भाषांमध्ये ते अनेकवचनी असणे आवशक आहे.या नंतर “तूम्ही” आणि “तुमचे” या घटना अनेकवचनामध्ये आहेत. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

Connecting Statement:

येशू जुन्या कराराची पूर्तता कशी करतो याबद्दल शिकवत आहे. येथे तो शत्रूवरील प्रीतीविषयी बोलत आहे.

that it was said

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पहा तूम्ही मत्तय 5:27मध्ये कसे भाषांतर केले आहे. वैकल्पिक भाषांतर: “देव म्हणाला की” किंवा “मोशे म्हणाला की” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

your neighbor

येथे “शेजारी” हा शब्द विशिष्ट “शेजाऱ्याला” दर्शवत नाही, पण एखादया समुदायाच्या सदस्याला किंवा लोक समूहाला दर्शवतो. हे असे लोक आहेत ज्यांना सहसा दयाळूपणे वागवण्याची इच्छा असते किंवा असे वाटते की त्यांनी किमान विश्वासणाऱ्यांना दयाळूपणे वागवले पाहिजे. वैकल्पिक भाषांतर: “आपले देशवासी” किंवा “आपल्या लोकांच्या गटातील लोक” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-genericnoun)

Matthew 5:44

But I say

येशू देवाशी आणि याच्या वचनाशी सहमत होता,परंतु धार्मिक पुढाऱ्यांनी देवाच्या वचनाचे जसे लागूकरण केले त्याच्या विषयी तो सहमत नव्हता. शब्द “मी” हा परिणामकारक आहे. यावरून हे सूचित होते की येशू जे म्हणतो त्याला देवाच्या मूळ आज्ञा समान महत्व आहे. या वाक्याचा अशा प्रकारे अनुवाद करण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये जोर दर्शवला जातो. आपण मत्तय 5:22 मध्ये हे कसे भाषांतरीत केले ते पहा.

Matthew 5:45

you may be sons of your Father

“मुले” हे त्याच भाषेत अनुवाद करणे चांगले आहे की आपली भाषा नैसर्गिकरीत्या मानवी पुत्रासाठी किंवा मुलासाठी वापरली जाईल.

Father

हे देवासाठी महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#guidelines-sonofgodprinciples)

Matthew 5:46

General Information:

लोकांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू लोकांच्या एका गटाशी बोलत आहे. “तूम्ही” आणि “तुमचे” हे घटक अनेकवचनी आहेत. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

Connecting Statement:

येशू जुन्या कराराच्या नियमांची पूर्णता कशी करतो हे शिकवणे संपवतो. या भागाची सुरुवात मत्तय 5:17 मध्ये झाली.

what reward do you get?

येशू हा प्रश्न लोकांना शिकवण्यासाठी वापरत असे की जे त्यांच्यावर प्रेम करणारे आहेत ते असे काही विशेष नाहीत की ज्यांना देव प्रतिफळ देईल. हा अलंकारिक प्रश्न एक वाक्य म्हणून भाषांतर केला जाऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “तुम्हास प्रतिफळ मिळणार नाही”. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion)

Do not even the tax collectors do the same thing?

हा अलंकारिक प्रश्न वाक्य म्हणून भाषांतर केला जाऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “कर गोळा करणारे सुद्धा असेच करतात” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion)

Matthew 5:47

what do you do more than others?

हा प्रश्न वाक्य म्हणून भाषांतर केला जाऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “तूम्ही इतर लोकांपेक्षा काहीएक चांगले करत नाही” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion)

greet

हा एक साधारण शब्द आहे जो ऐकणाऱ्यांच्या कल्याणासाठी इच्छा दर्शवणारा आहे.

Do not even the Gentiles do the same thing?

हा प्रश्न वाक्य म्हणून भाषांतर केला जाऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “परराष्ट्रीय सुद्धा असेच करतात” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion)

Matthew 5:48

Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#guidelines-sonofgodprinciples)