तीतुस 2

1 पण तू अशा गोष्टी कर जे खऱ्या उपदेशाचा योग्य हायत. 2 अर्थात~मताऱ्या माणसांनी,खरे अन् गंभीर अन् संयमी रायचं,अन् त्यांयचा विश्वास अन् प्रेम धीरई पक्कं अशाले पायजे. 3 अशाच प्रकारे मताऱ्या बायांचे चालचलन पवित्र आदरणीय असावे,दोष लावणारी अन् दारुडी नसावी पण चांगल्यागोष्टी शिकवणारी असावी. 4 यासाठी कि त्यांनी तरून बायांना असे शिक्षण द्यावे,कि आपला नवरा अन् लेकरांवर प्रेम कर. 5 या संयमी,शुध्दाचरणी घरचे काम करणारी,मायाळू अन् आपआपल्या नवऱ्याच्या आधीन रायणारी असावी म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाई. 6 असे जवान पोरांना पण समजावं,कि ते संयमी असावे. 7 सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या स्वताला चांगल्या कामाचा नमुना बनवं कि तुह्ये भाषण चांगले गंभीरतापूर्वक असावें. 8 अन् खराई असावी कि कोणी बेकार नाई म्हणावं,ज्यानें विरोधी आपल्यावर कोणताही दोष लावण्याची हिम्मत नाई करावं. 9 दासांना समजावं कि आपल्या आपल्या स्वामीच्या आधीन होऊन जा,अन् सगळ्या गोष्टी मध्ये त्यांयलें प्रसन्न ठेवावे,अन् उलटून उत्तर नाई द्यावें. 10 चोरी चापलुसी नाई करावी,पण सगळे विश्वासी निगावे,ते सगळ्या गोष्टीमध्ये आपला तारणहारा देवाच्या उपदेशाला शोभा देईन असे. 11 कावून कि देवाची कृपा प्रगट हाय,जे सगळ्या माणसाच्या तारणाचे कारण हाय. 12 अन् आपल्याला चीतवाते,कि आपुन अभक्ति अन् संसारिक वासनां पासून मन काढून या युगाचे संयमाने अन् धर्माने अन् भक्ती ने जीवन जगवावे. 13 अन् त्या धन्य आशाप्राप्तीची अर्थात~आपल्या महान देव अन् तारणहारा येशू ख्रिस्ताची महिमा प्रगट होण्याची वाट पायत राहावी. 14 त्यानें स्वताला आपल्याकरता दिले,कि आपल्याले हर प्रकाराच्या अधर्मा पासून मुक्त करावे अन् शुद्ध करून आपल्यासाठी असी एक जाती बनवावी जे चांगल्या चांगल्या कामात तत्पर हो. 15 पुऱ्या अधिकाराने ह्या गोष्टी सांग,अन् समजावं अन् शिकवत राहा,कोणीही तुले तुच्छ नाई समजावे.