तीतुस 1

1 पौंलाच्या इकून जो देवाच्या दास अन् येशू ख्रिस्ताचा प्रेषित हाय,देवाचे निवडलेले लोकांचा विश्वास अन् भक्तीच्या अनुसार हाय. 2 त्या अनंत जीवनाच्या आशेने ज्याची प्रतिज्ञा देवाने जो खोटा नाई बोलू शकत सनातना पासून केली हाय. 3 पण बरोबर वेळी आपल्या वचनाला प्रचार करण्याच्या व्दारे प्रगत केले,जो आपला तारण देणारा देवाणे आज्ञेच्या अनुसार मले सोपुन देलं हाय. 4 तीताला च्या नावाने जो विश्वासाच्या सहभागीतेच्या मध्ये विचारात माह्याल्या खरां पोरगा हाय,देव बाप अन् आपला तारणहारा ख्रिस्त येशू पासून अनुग्रह अन् शांती होतं राहो. 5 मी या साठी तुले क्रेते मध्ये सोडून आलो,कि तू अपुऱ्या रायलेल्या गोष्टीची व्यवस्था करावी,अन् माह्याल्या आज्ञेच्या अनुसार नगर नगर जाऊन वडील नेमावेत. 6 जो निर्दोष अन् एकाचा बायकोचा नवरा असावा,ज्याचे लेकरं बाकरं विश्वासात आसावे ज्यायलें दुराचाराच्या आरोप नसावा अन् नाहि अनावर दोषी. 7 कावून कि अध्यक्ष देवाचा भंडारी होण्यासाठी निर्दोस असणे गरजेचे हाय,नाहि स्वच्छदी नाहि रागीट नाहि पेणारादारुड्यानाहि मारपिट करणारा, नाहि अनीतीचे पैसे कमावणारा. 8 पण पाहुण्याचा आदर करणारा,चांगुलपणाची आवड धरणारा,संयमी,न्याय करणारा,पवित्र अन् मर्यादशील. 9 अन् विश्वासयोग्य वचनावर जे धर्माच्या अनुसार हायत धरून राहणारा,यासाठी खऱ्या शिक्षा देण्यासाठी,वादकरणाऱ्याचे तोंड बंध करणारा. 10 कावून कि बरेचं लोकं,अनावर व्यर्थ बोलणारे अन् फसवणूक करणारे,विशेषकरून खतना वाल्यातून. 11 यायचें तोंड बंद करायला पायजे,हे लोकं अनीतीच्या पैसासाठी अशा गोष्टी शिकवून घरचे घर बिगडून टाकतात. 12 त्यांयच्या पैकी एका झनाने जो त्यांयचाच भविष्यवक्ता हाय,त्यानें म्हणले,कि क्रेते चे लोकं लबाड खोटे दृष्ट पशुं अन् आळसी व खादोडे असतात. 13 हे साक्ष खरी हाय,म्हणून,त्यांयलें कडकपणे सांग,कि ते विश्वासात मजबुत होऊन जाये. 14 अन् ते यहुदियांची कथा कहाणीवर अन् त्या माणसायच्या आज्ञावर मन नका लावू, जे सत्या पासून भटकलेले हायत. 15 शुद्ध लोकांना सगळ्या वस्तुं शुद्ध हायत,पण अशुद्ध अन् अविश्वासीयांच्या साठी काई पण शुद्ध नाई हेचं नाई पण त्यांयची बुद्धी अन् विवेक दोनीही अशुद्ध हात. 16 ते म्हणतात,कि आमी देवाले ओळखतो,पण आपल्या कामाने त्याच्या मना करतात,कावून कि ते घृणित अन् आज्ञा न माननारे हायत,अन् कोण्याहि चांगल्या कामा नाईतच्या योग्य.