तीतुस 3

1 लोकांना आठवण दे कि, सत्ताधीश अधिकाऱ्याच्या ह्याच्या आधीन राहावे,अन् त्यांयच्या आज्ञा माने,अन् हर एक चांगल्या कामासाठी तयार राय. 2 कोणाले बदलाम नाई करावे,भांडणकरणारा नसावा,अन् सगळ्या माणसाच्या संग नम्रतेने रायणारा असावा. 3 कावून कि आमी पण पयले निर्बुद्धी,अन् आज्ञा नाई मानणारे,अन् बहकलेले अन् नाना प्रकारच्या वासनांनी अन् सुखाचे दास होतो,अन् दृष्टपणा व हेवा ह्यात आयुष्य घालवणारे,अन् व्देशपात्र व एकामेकांच्या व्देष करणारे असे होतो. 4 पण जवा आपला तारणहारा देवाची कृपा,अन् माणसावर त्याचें प्रेम प्रगट झाले. 5 तवा त्यानं आपले तारण केलें हाय,अन् हे धर्माच्या कारणाने नाई,जे आमी अन् तुमी केलें,पण आपल्या दयेच्या अनुसार,नवीन जन्माचे जागी अन् पवित्र आत्म्याच्या नवीन बनण्याने व्दारा झालें. 6 त्यानें तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या व्दारे आपल्यावर विपुलतेने ओतला हाय.. 7 ज्यालें आमी त्याच्या अनुग्रहाने धर्मी झाला,अनंत जीवनाच्या आशेच्या अनुसार वारीस बने. 8 हे गोष्ट खरी हाय,अन् मले वाटते,कि तू या विषयात खात्रीने बोलावे,ह्यासाठी कि ,ज्यांयनं देवावर विश्वास ठेवला हाय,त्यांयनं चांगले चांगले कामे करावी,ह्या गोष्टी हितकारी अन् माणसाच्या लाभाची हाय. 9 पण मूर्खतेच्या विवादात,अन् वंशावळ्या,अन् कलह विरोध करणे,अन् त्या भांडणे,जे व्यवस्थेच्या विषयात हो,म्हणून वाचून राय,कावून कि ते निष्फळ अन् व्यर्थ हाय. 10 कोण्या पाखंडी ला एकदा दोनदा समजावं अन् त्याच्या पासुन दूर राहा. 11 हे जाणून कि असा माणूस बिगडलेला हाय,अन् त्यानं स्वताचं स्वताले दोषी ठरवले,असून तो पाप करत रायतो. 12 जवा मी तुह्या पासी अर्तमाला किंवा तुखीखाला तुह्यापासी पाठवल्यावर,होईन तितके करून माह्यापासी निकपलीसास निघून ये कारण तेथे हिवाळा घालवण्याचे मी ठरवले हाय. 13 जेन्यास शास्त्री व अपुल्लोसला यत्न करून समोर पाठवं,अन् पाह्य,त्यांयलें कोण्या गोष्टीची कमीघटी नाई झाली पायजे. 14 अन् आपले लोकं पण गरजा पुऱ्या करण्यासाठी चांगल्या कामात लागावे,याकरिता कि निष्फळ होणार नाईत. 15 माह्याल्या सगळ्या साथीदारांच्या इकून तुले नमस्कार,अन् जे विश्वासाच्या कारणाने आपल्याला प्रेम करतात,त्यांयलें नमस्कार तुमच्या सगळ्यावर अनुग्रह होतं राहे.