Matthew 15

Matthew 15:1

धार्मिक पुढारी व येशुमध्ये अचानक पडलेल्या गांठभेटीची येथे सुरुवात होते.

वाडवडिलांचा संप्रदाय मोडणे

"जुन्या धार्मिक पुढाऱ्यानी दिलेल्या नियमांचा सन्मान न करणे."

त्यांचे हात धुणे

"नियमशास्त्राच्याद्वारे आवश्यक मागणी नुसार ते समारंभांत त्यांचे हात धूत नाहीत" (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

Matthew 15:4

शास्त्री आणि परुशी व येशू ह्यांच्यामध्ये अचानक पडलेली गांठभेट पुढे चालू.

जो कोणी

"कुणीही" किंवा "जर कोणीही"

त्याच्या बापाचा सन्मान करतो

त्याच्या बापाची काळजी घेण्या द्वारे सन्मान दाखवितो

तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे

AT: "तुम्ही संप्रदायेला देवाच्या वचनापेक्षा उच्च दर्जा दिला आहे"

Matthew 15:7

शास्त्री आणि परुशी व येशू ह्यांच्यामध्ये अचानक पडलेली गांठभेट पुढे चालू.

यशयाने यथायोग्य संदेश दिला

AT: "ह्या संदेशामध्ये यशयाने सत्य सांगितले"

जेव्हा त्याने म्हटले

AT: "देवाने काय म्हटले ते त्याने सांगितले"

हे लोक ओठांनी माझा सन्मान करितात

AT: "हे लोक सर्वकांही योग्य तेच बोलतात"

परंतु त्यांचे अंत:कारण माझ्यापासून दूर आहे

AT: "परंतु खऱ्या अर्थाने ते माझ्यावर प्रेम करीत नाहीत." (पाहा: वाक्प्रचार)

ते व्यर्थ माझी उपासना करितात

AT: "त्यांच्या उपासनेचा माझ्यावर कांहीच प्रभाव पडत नाही" किंवा "ते माझी उपासना करण्याचे नुसते ढोंग करतात"

लोकांचे आदेश

"लोकांनी केलेलं नियम."

Matthew 15:10

येशू लोकसमुदायाला दाखल्या द्वारे शिकवितो.

ऐका व समजून घ्या

पुढे येणाऱ्या महत्वाच्या माहितीवर येशू जोर देत आहे.

Matthew 15:12

१५:११ मधील त्याच्या दाखल्याला येशू त्याच्या शिष्यांना स्पष्ट करून सांगत आहे.

परुश्यांनी जेव्हा हे विधान ऐकले तेव्हा ते नाराज झाले?

AT: "ह्या विधानाने परुष्यांना राग आला?" किंवा "ह्या विधानामुळे परुशी नाराज झाले? (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

Matthew 15:15

१५:११ मधील त्याच्या दाखल्याला येशू त्याच्या शिष्यांना स्पष्ट करून सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.

आम्हांला

"शिष्यांना"

उतरते

"जाते"

शौचकूप

लोक जेथे शरीराच्या विष्टेला दफन करतात त्या जागेसाठी हा विनयशील शब्द वापरला आहे.

Matthew 15:18

१५:११ मधील त्याच्या दाखल्याला येशू त्याच्या शिष्यांना स्पष्ट करून सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.

जे तोंडातून निघते ते

"एखादा व्यक्ती जे शब्द बोलतो ते."

अंत:करणातून येते

"एखाद्या व्यक्तीच्या खऱ्या भावनेचा आणि विचारांचा परिणाम."

खून

निरपराध लोकांना ठार मारणे

अपमान

"लोकांना दु:खावेल असे बोलणे"

न धुतलेले हात

समारंभांत न धुतलेले हात

Matthew 15:21

एका कनानी स्त्रिच्या मुलीला येशू बरे करतो तो अहवाल येथे सुरु होतो,

त्या भागातील एक कनानी बाई आली

इस्राएल देशाच्या बाहेर असलेले स्वत:चे गाव सोडून एक स्त्री इस्राएल देशांत आली आणि येशूला भेटली.

कनानी स्त्री

कनान देश आता अस्तित्वांत राहिला नाही: "कनानी लोक गटातील एक स्त्री."

माझी मुलगी भुताने फारच जर्जर केली आहे

"भूत माझ्या मुलीला फारच यातना देत आहे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

तिला एका शब्दानेहि उत्तर दिले नाही

"कांहीही सांगितले नाही."

Matthew 15:24

एका कनानी स्त्रिच्या मुलीला येशू बरे करतो तो अहवाल पुढे चालू.

ती आली

"कनानी स्त्री आली"

मुलांची भाकर....लहान कुत्रें

"यहूदी लोकांच्या मालकीचे योग्य काय आहे ते.....परराष्ट्रीयाना" (पाहा: रूपक)

Matthew 15:27

एका कनानी स्त्रिच्या मुलीला येशू बरे करतो तो अहवाल पुढे चालू.

तरी लहान कुत्रीहि आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात

यहूदी फेकीत असलेला चांगल्या गोष्टींचा थोडासा भाग पर राष्ट्रीयांना सुद्धा मिळावा. (पाहा: रूपक)

तिची मुलगी बरी झाली

"येशूने तिच्या मुलीला बरे केले" किंवा "येशूने तिच्या मुलीला संपूर्ण निरोगी केले" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

त्याच घटकेस

"अगदी बरोबर त्याच वेळेस" मिन्वा "तुरंत"

Matthew 15:29

गालीलामधील लोकांच्या मोठ्या थव्यांतील लोकांना येशू बरे करतो तो अहवाल येथे सुरु.

लंगडे, आंधळे, मुके, आणि व्यंग लोक

"ते लोक जे चालू शकत नव्हते, कांही लोक बघू शकत नव्हते, कांही बोलू शकत नव्हते, आणि इतर दुसरे ज्यांचे हात आणि पाय वांकडे झाले होते." प्रारंभीच्या मजकुरांमध्ये ह्या शब्दांचा वेगळा क्रम आहे.

त्यांना त्यांनी येशूच्या पायांजवळ आणून ठेवले

"लोकसमुदायाने आजारी लोकांना येशूकडे आणले."

Matthew 15:32

गालीलामधील लोकांच्या त्या मोठ्या थव्याला येशू खावयास देतो हा अहवाल पुढे चालू.

त्यांनी चक्कर येऊन पडू नये

संभाव्य अर्थ: १) "ही भीती की, ते बेशुद्ध होतील" किंवा २) "ही भीती की ते अशक्त होतील" (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)

बसा

जेव्हा मेज नसतो तेव्हा लोकांची जेवावयाची पद्धत कशी आहे, ते बसतात खाली बसून किंवा पडून जेवतात्त व त्यासाठी तुमच्या भाषेत जो शब्द आहे त्याचा येथे उपयोग करा.

Matthew 15:36

गालीलामधील लोकांच्या त्या मोठ्या थव्याला येशू खावयास देतो हा अहवाल पुढे चालू.

त्याने घेतल्या

"येशूने घेतल्या"

१४:१९ मध्ये ह्याचे जसे ह्याचे भाषांतर केले तसेच करा.

त्यांना दिले

"भाकरी आणि मासे त्यांना दिले"

त्यांनी गोळा केले

"शिष्यांनी गोळा केले"

ज्यांनी खाल्ले ते

"ज्या लोकांनी खाल्ले ते"

प्रदेश

"देशाचा भाग"

मगदान

कधी कधी त्याला "मगदाला" असे म्हणतात. (पाहा: नावांचे भाषांतर)