Matthew 10

Matthew 10:1

येशू त्याच्या बारा प्रेषितांना त्याचे कार्य करण्यासाठी पाठवितो तो अहवाल येथे सुरु होतो.

त्याने त्याच्या बारा शिष्यांना एकत्र बोलाविले

"त्याच्या बारा शिष्यांना त्याच्याजवळ बोलाविले"

त्यांना अधिकार दिला

ह्याची खात्री करा की त्याचा अधिकार हा १) अशुद्ध आत्म्यांना काढून टाकणे आणि २) रोग व आजार बरे करणे ह्यासाठी होता हे मजकूर स्पष्टपणे संप्रेषित करतो.

काढून टाकणे

"अशुद्ध आत्म्यांना सोडून जाण्यांस सांगणे"

सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी

"प्रत्येक रोग व प्रत्येक दुखणी." "रोग आणि "दुखणी" हे दोन शब्द घनिष्ट संबंधित आहेत परंतु शक्यतो ते दोन वेगळे शब्द आहेत असे त्यांचे भाषांतर केले पाहिजे. "रोगामुळे" एखादा व्यक्ती आजारी पडतो. "आजार" हा रोगामुळे आलेली शारीरिक दुर्बलता आणि दुखणे होय.

Matthew 10:2

१०:१ मध्ये सुरु झालेला की येशू त्याच्या बारा प्रेषितांना त्याचे कार्य करण्यासाठी पाठवितो तो अहवाल पुढे चालू.

पहिला

क्रमाने, दर्जाने नव्हे.

झिलोट

संभाव्य अर्थ १) "कट्टर" किंवा २) "आवेशी" पहिला अर्थ हे सूचित करतो की तो त्या संघटनेचा सदस्य होता जो यहूदी लोकांना रोमन सत्तेपासून मुक्त करण्यासाठी लढत होते. पर्यायी भाषांतर: "देशभक्त" किंवा "राष्ट्रवादी" किंवा "स्वातंत्र्य सैनिक," दुसरा अर्थ हे सूचित करतो की तो देवाच्या सन्माना प्रती आवेशी होता. पर्यायी भाषांतर: "आवेशयुक्त"

जकातदार मत्तय

"मत्तय, जो जकात घेत होता"

त्याला धरून देणारा

"येशूला धरून देणारा"

Matthew 10:5

येशू त्याच्या बारा शिष्यांना त्याचे कार्य करण्यासाठी पाठवितो तो अहवाल पुढे चालू.

ह्या बारा जणांना येशूने पाठविले

:येशूने ह्या बारा पुरुषांना पाठविले" किंवा "हे ते बारा लोक होते ज्यांना येशूने पाठविले होते"

पाठविले

येशूने त्यांना एका खास विशेष कामासाठी पाठविले होते. "प्रेषित ह्या सर्वनामाचा तो शाब्दिक प्रकार आहे ज्याचा उपयोग १०:२ मध्ये केला गेला आहे.

त्याने त्यांना सूचना दिली

"त्यांनी काय करावयास पाहिजे होते हे त्याने त्यांना सागितले" ह्याचे ह्या प्रकारे भाषांतर होऊ शकत "त्याने त्यांना आज्ञा केली."

इस्राएलाच्या घराण्यांतील हरवलेली मेंढरे

हे रूपक आहे त्यांच्या मेंढपाळापासून दूर भटकलेल्या मेंढराशी इस्राएलाच्या संपूर्ण राष्ट्राची तुलना करणे (यु डी बी ). (पाहा: रूपक)

इस्राएलाचे घराणे

ही अभिव्यक्ति इस्राएल राष्ट्राच उल्लेख करते. ह्याचे असे भाषांतर केल जाऊ शकते "इस्राएलाचे लोक" किंवा "इस्राएलाचे वंशज." (पाहां: सामीप्यमुलक लक्षणा)

जात असतांना

सर्वनाम "तुम्ही" हे त्याच्या बारा प्रेषितांचा उल्लेख करतो.

स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे

३:२ मधील कल्पनेचे तुम्ही जसे भाषांतर केले आहे तसेच ह्याचे देखील करा.

Matthew 10:8

१०:१ मध्ये सुरु झालेला की येशू त्याच्या शिष्यांना त्याचे कार्य करण्यासाठी पाठवितो तो अहवाल पुढे चालू.

तुम्ही...तुम्हांला

बारा प्रेषित

सोने, रुपें किंवा तांबे घेऊ नका

"सोएने, रुपें, किंवा तांबे घेऊच नका"

गोळा करणे

"घेणे," "प्राप्त करणे," किंवा "घेणे"

सोने, रुपें, किंवा तांबे

हे धातू आहेत ज्यांपासून नाणी बनविली जात होती. ही यादी पैशाची सामीप्यमुलक आहे, जर तुमच्या क्षेत्रामध्ये घातु अज्ञात असतील तर त्या यादीचे "पैसे" म्हणून भाषांतर करा. (पाहा: यु डी बी ).

पैशाची पिशवी

ह्याचा अर्थ "कमरपट्टे" किंवा "पैसे ठेवण्याचे पट्टे" परंतु पैसे घेऊन जाण्याच्या वस्तूला काहीहि नाव असो. पट्टा हा कड्याचा किंवा चार्माचा लांब कमरेला बांधला जाणारि पट्टी असते. ती एवढी पुरेशी रुंद असत की तिची घडी करू शकतात किवा पैसे ठेवण्यासाठी तिचा उपयोग करू शकतात.

प्रवास पिशवी

ही प्रवासामध्ये लागणाऱ्या

याऱ्य वस्तूंना घेऊन जाण्यासाठी असलेली पिशवी असू शकते किंवा अन्न किंवा पैसे गोळा करण्यासाठी असलेली पिशवी असू शकत.

मजूर

"कामकरी"

अन्न

"त्याला ज्याची गरज आहे"

Matthew 10:11

१०:१ मध्ये सुरु झालेला की येशू त्याच्या बारा प्रेषित त्याचे कार्य करण्यासाठी पाठवितो तो अहवाल पुढे चालू.

तुम्ही...तुम्हांला

ही सर्वनामे बारा प्रेषितांचा उल्लेख करतात.

ज्या कोणत्या नगरांत किंवा गावांत तुम्ही प्रवेश कराल

"जेव्हा जेव्हा तुम्ही नगरांत किंवा गावांत प्रवेश कराल" किंवा "प्रत्येक नगरांत किंवा गावांत तुम्ही जाल"

नगर...गाव

"मोठे गाव....लहान गांव" किंवा "मोठे नगर.....लहान नगर" ९:३५ मध्ये असलेले तेच शब्द येथे सुद्धा आहेत.

तेथून जाईपर्यंत तेथेच राहा

"ते नगर किंवा गाव सोडेपर्यंत त्याच व्यक्तीच्या घरांत राहा"

तुम्ही घरांत जातांना, अभिवादन करा

"तुम्ही घरांत जातांना घरांत राहाणाना अभिवादन करा." "ह्या घराला शांती असो" असे त्याकाळचे अभिवादन होते (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

घर योग्य असले

"त्या घरांत राहाणाऱ्यानी जर तुमचे चांगले स्वागत केले" (यु डी बी ) किंवा "त्या घरांत राहाणाऱ्या

याऱ्य लोकांनी तुम्हांला चांगली वागणूक दिली तर" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

त्यांना तुमची शांती प्राप्त होवो

"त्यांच्यावर तुमची शांती येवो" किंवा "त्या घरांत राहाणारे लोक शांतीने राहो" (यु डी बी )

तुमची शांती

त्या घरातील लोकांना ती शांती प्राप्त व्हावी म्हणून प्रेषित देवाची प्रार्थना करणार.

ते योग्य नसले तर

"त्यांनी जर तुमचे चांगले स्वागत केले नाही तर" (यु डी बी ) किंवा "त्यांनी तुम्हांला चांगली वागणून दिली नाही तर"

तुमची शांती तुम्हांकडे परत येवो

ह्या दोघांपैकी एक अर्थ असू शकतो १) जर ते घर योग्य नसेल तर, देव त्या घरावर त्याची शांती किंवा आशीर्वाद रोखून धरील, जसे (यु डी बी ), मध्ये व्यक्त केले आहे किंवा २) जर ते घर योग्य नसले तर प्रेषित कांहीतरी करणार होते, जसे देवाने त्यांच्या अभिवादनाचा सन्मान करू नये हे ते देवाला विचारणार होते. जर तुमच्या भाषेमध्ये अभिवादन किंवा त्याचा परिणाम मागे घेण्याचा प्रबंध असेल तर येथे त्याचा उपयोग अवश्य करा.

Matthew 10:14

१०:१ मध्ये सुरु झालेला की येशू त्याच्या बारा प्रेषित त्याचे कार्य करण्यासाठी पाठवितो तो अहवाल पुढे चालू.

जे कोणी तुमचे स्वागत करणार नाही किंवा ऐकणार नाही

"त्या नगरांतील लोक जर तुमचे स्वागत करणार नाहीत किंवा तुमचे ऐकणार नाहीत"

तुम्ही....तुम्हांला

बारा प्रेषित

तुमची वचने ऐकणार

"तुमचा संदेश ऐकणार" (यु डी बी ) किंवा "तुम्हांला जे कांही सांगावयाचे आहे ते ते ऐकणार नाहीत"

नगर

१०:११ मध्ये जसे तुम्ही भाषांतर केले तसेच ह्याचे देखील करा.

आपल्या पायांची धूळ झटकून टाका

"त्या घराची किंवा त्या नगराची धूळ झटकून टाका." देवाने त्या घरातील किंवा त्या नगरातील लोकांचा अस्वीकार केला आहे ह्याचे हे चिन्ह आहे (पाहा यु डी बी )

अधिक सोपे जाईल

"दु:ख कमी होईल"

सदोम व गमोरा देश

"सदोम आणि गमोरा ह्या देशांमध्ये जे राहात होते ते लोक" ज्यांना देवाने आकाशातून अग्नी वर्षाव करून नष्ट केले (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

ते नगर

त्या नगरातील लोक जे प्रेषितांचा स्वीकार करणार नाहीत किंवा त्यांचे ऐकणार नाहीत (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

Matthew 10:16

येशू त्याच्या शिष्यांना त्याच्यासाठी त्यांना सहन कराव्या लागणाऱ्या भावी छळाबद्दल सांगण्यांस सुरुवात करीत आहे.

पाहा

"पाहा" शब्द मागून येणाऱ्या गोष्टींवर भर देत आहे. पर्यायी भाषांतर: "मी आता जे तुम्हांला सांगणार आहे त्याकडे लक्ष द्या" (पाहा यु डी बी )

मी तुम्हांला पाठवितो

येशू त्यांना एका विशिष्ट कारणासाठी पाठवीत आहे.

लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे

येशू त्याच्या ज्या शिष्यांना पाठवीत आहे त्यांची तुलना तो जेथे हिंसक प्राणी त्यांच्यावर हल्ला करू शकतील अशा ठिकाणी जाणाऱ्या व स्वत:चे संरक्षण करण्यांस असमर्थ अशा प्राण्यांशी करीत आहे. (पाहा: उपमा)

मेंढरांसारखे

स्वत;चे संरक्षण करण्यांस असमर्थ (पाहा: उपमा)

लांडग्यांमध्ये

तुम्ही उपमेस स्पष्ट करू शकता जसे "लांडग्यांसारख्या धोकादायक लोकामध्ये" किंवा "धोकादायक प्राणी जसे वागतात असे वागणाऱ्या लोकांमध्ये" किंवा सारखेपणाच्या गोष्टीस नमूद करा, "जे लोक तुमच्यावर हल्ला करतील अशा लोकांमध्ये" (पाहा: रूपक)

सापांसारखे चतुर आणि कबूतरांसारखे निरुपद्रवी व्हा

उपमेस येथे नमूद न केलेलं फार चांगले (पाहा: उपमा) "समजबुद्धीने आणि जपून, तसेच निरागसपणाने आणि चांगुलपणाने वागा." (पाहा: उपमा)

लोकांपासून जपून राहा, कारण ते तुम्हांला धरून देतील

"सावध राहा, कारण लोक तुम्हांला धरून देतील."

च्या पासून जपून राहा

"लक्ष असू द्या" किंवा "जपून राहा" किंवा "च्या बद्दल स्वत:ची काळजी घ्या" (पाहा: रूपक)

तुम्हांला धरून देतील

यहूदाने येशूला काय केले त्यासाठी हा शब्द आहे. (पाहा यु डी बी ) पर्यायी भाषांतर: "तुमचा विश्वासघात करतील" किंवा "तुम्हांला धरून देतील" किंवा "तुम्हांला अटक करून वेठीस धरले गेले होते काय."

न्यायसभा

येथे अर्थ स्थानिक धार्मिक पुढारी किंवा वडील जन जे दोघे मिळून समाजामध्ये शांती राखतात. पर्यायी भाषांतर: "न्यायालायें."

तुम्हांला फटके मारतील

"चाबकाने तुम्हांला फटके मारतील"

तुम्हांला आणण्यांत येईल

"ते तुम्हांला घेऊन येतील" किंवा "ते तुम्हांला खेचून आणतील" (पाहा: कर्तरि किंवा कर्मणी)

माझ्यामुळे

"कारण तुम्ही माझ्या मालकीचे आहांत" (यु डी बी ) "कारण तुम्ही माझे अनुसरण करता"

तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना

"त्यांना" हे सर्वनाम "राज्यपालांचा आणि राजांचा" किंवा यहूदी आरोप्यांचा उल्लेख करतो (१०:१७).

Matthew 10:19

येशूने १०:१६ मध्ये त्याच्या प्रेषित त्याच्यासाठी पुढे येणारा छळ सहन करावा लागेल हे सांगण्याचे सुरु केले होते ते तो चालू ठेवतो.

जेव्हा ते तुम्हांला धरून देतील

"जेव्हा लोक तुम्हांला धरून देतील" ते "लोक" म्हणजे येथे १०:१७ मधील तेच "लोक."

धरून देतील

१०;१७ मध्ये जसे तुम्ही ह्याचे भाषांतर केले आहे तसेच करा.

तुम्ही

"तुम्ही" आणि "तुम्हांला" ही सर्वनामे संपूर्ण उताऱ्यामध्ये आली आहेत जी बारा प्रेषितांचा उल्लेख करतात.

काळजी करू नका

"चिंता करू नका"

तुम्ही कसे व काय बोलावे

"तुम्ही कसे बोलावे किंवा काय बोलावे" येथे दोन्ही कल्पनांना जोडू शकतो: "तुम्ही काय बोलावे" (पाहा: विशेषण)

त्या घटकेस

"त्या वेळेस" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

तुमच्या पित्याचा आत्मा

जर आवश्यकता पडल्यास ह्याचे असे भाषांतर केले जाऊ शकत "तुमच्या स्वर्गीय पित्याचा आत्मा" हे कोणत्याहि जगिक पित्याचा नव्हे तर देव पवित्र आत्म्याचा उल्लेख करीत आहे हे स्पष्ट करण्यासाठी मजकूरासोबत छोटीसी टिप्पणी द्या.

तुमच्या मधील

"तुमच्या द्वारे"

Matthew 10:21

येशूने १०:१६ मध्ये त्याच्या प्रेषितांना त्याच्यासाठी पुढे येणारा छळ सहन करावा लागेल हे सांगण्याचे सुरु केले होते ते तो चालू ठेवतो.

भाऊ भावाला आणि पिता मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देतील

AT: "भाऊ त्यांच्या भावांना आणि पिता त्यांच्या मुलांना जिवे मारण्यासाठी धरून देतील"

धरून देतील

१०:१७ मध्ये जसे त उम्ही ह्याचे भाषांतर केले आहे तसेच येथेहि करा.

विरुद्ध उठतील

"विरुद्ध बंड करतील" किंवा "पाठ फिरावितील"

त्यांना ठार करतील

"त्यांना ठार मारू देतील" किंवा "अधिकाऱ्याना त्यांना ठार मारू देतील"

सर्वांद्वारे तुमचा द्वेष केला जाईल

AT: "प्रत्येक जण तुमचा द्वेष करतील" किंवा "सर्व लोक तुमचा द्वेष करतील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

तुम्ही....तुम्हांला...तुम्ही...तुम्हांला

बारा प्रेषित

माझ्या नावामुळे

"माझ्यामुळे" किंवा "कारण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून" (यु डी बी )

जो कोणी टिकेल

"जो कोणी विश्वासू राहील"

तोच व्यक्ती तरेल

AT: "देव त्या व्यक्तीचा बचाव करील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

दुसऱ्यात पळून जा

"दुसऱ्या नगरांत पळून जा"

आला आहे

"येत आहे"

Matthew 10:24

येशूने १०:१६ मध्ये त्याच्या शिष्यांना त्याच्यासाठी पुढे येणारा छळ सहन करावा लागेल हे सांगण्याचे सुरु केले होते ते तो चालू ठेवतो.

गुरूपेक्षा शिष्य थोर नाही

हे कोणा विशिष्ट शिष्याचे किंवा गुरुचे विधान नसून एक सामान्य सत्याचे विधान आहे. एक शिष्य "त्याच्या गुरूपेक्षा अधिक महत्वाचा नाही." हे ह्यासाठी असू शकते की "त्याला अधिक माहिती नसते" किंवा "त्याचा उच्च दर्जा नसतो" किंवा गुरूपेक्षा "तो अधिक चांगला नाही" पर्यायी भाषांतर: "एक शिष्य नेहमी त्याच्या गुरूपेक्षा कमी महत्वाचा असतो" किंवा "एक गुरु त्याच्या शिष्यापेक्षा नेहमी अधिक महत्त्वाचा असतो."

धन्यापेक्षा दास थोर नाही

"आणि दास त्याच्या धण्यापेक्षा श्रेष्ठ नाही." हे कोणा विशिष्ट धन्याचे किंवा दासाचे विधान नसून एक सामान्य सत्याचे विधान आहे. एक दास त्याच्या धन्यापेक्षा "थोर" किंवा "अधिक महत्वाचा" नाही. पर्यायी भाषांतर: "एक दास नेहमी त्याच्या धन्यापेक्षा कमी महत्वाचा असतो" किंवा "एक धनी त्याच्या दासापेक्षा नेहमी अधिक महत्त्वाचा असतो."

दास

"गुलाम"

धनी

"मालक"

शिष्याने गुरुसारखे व्हावे इतके त्यांस पुरे

"एक शिष्य त्याच्या गुरूसारखा होतो ह्याचे त्याला समाधाना वाटावे."

त्याच्या गुरुसारखे व्हावे

"जितके त्याचा गुरु जाणतो तितकेच त्याने जाणावे" किंवा "त्याने त्याच्या गुरुसारखे असावे."

आणि दासाने त्याच्या धन्यासारखे असावे

"आणि त्याने त्याच्या धन्याइतकेच महत्वाचे असावे ह्यांत त्याने समाधान मानावे"

जर घरधन्यास बालजबूल म्हटले तर घराच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील

येशूला वाईट वागणूक दिली गेली, तर येशूच्या शिष्यांनी तीच किंवा त्याच्यापेक्षा वाईट वागणूक त्यांना दिली जाईल ह्याची अपेक्षा करावी. (यु डी बी )

जर त्यांनी म्हटले

पर्यायी भाषांतर: "ज्याअर्थी लोकांनी म्हटले"

घरधनी

"घरधनी" म्हणून येशू स्वत:साठी ह्या रूपकाचा उपयोग करीत आहे. (पाहा: रूपक)

बालजबूल

मूळ भाषेतील शब्दाचे प्रत्यक्ष भाषांतर १) "बालजबूल" म्हणून भाषांतर केले जाऊ शकते किंवा २) त्याचा अभिप्रेत अर्थ "सैतान" म्हणून भाषांतर केले जाऊ शकते.

त्याच्या घरच्या माणसांना

येशू "त्याच्या घराच्या माणसांना" ह्या रूपकाचा त्याच्या शिष्यांसाठी उपयोग करीत आहे.

Matthew 10:26

येशूने १०:१६ मध्ये त्याच्या प्रेषिताना त्याच्यासाठी पुढे येणारा छळ सहन करावा लागेल हे सांगण्याचे सुरु केले होते ते तो चालू ठेवतो.

त्यांना भिऊ नका

"त्यांना" हे सर्वनाम जे लोक येशूच्या अनुयायांना वाईट वागणूक देतात त्यांचा उल्लेख करतो.

उघडकीस येणार नाही असे कांही झांकलेले नाही आणि कळणार नाही असे कांही गुप्त नाही

ह्या समांतरवादाचे असेहि भाषांतर केले जाऊ शकते "लोकांनी जे झांकलेले आहे ते देव उघडकीस आणील" (पाहा: समांतरवाद आणि कर्तरी किंवा कर्मणी)

जे मी तुम्हांस अंधारांत सांगतो ते उजेडांत बोला आणि तुमच्या कानांत सांगितलेले जे तुम्ही ऐकतां ते धाब्यावरून घोषित करा

ह्या समांतरवादाचे देखील असे भाषांतर होऊ शकते "जे मी तुम्हांला अंधारांत सांगतो ते लोकांना तुम्ही उजेडांत सांगा आणि तुम्ही कानांत जे हळुवारपणे ऐकले ते धाब्यावरून घोषित करा."

जे मी तुम्हांला अंधारांत सांगतो

"मी तुम्हांला जे गुप्तपणे सांगतो" (यु डी बी ) किंवा "ज्या गोष्टी मी तुम्हांला एकांतात सांगतो" (पाहा: रूपक)

उजेडांत सांगा

"उघडपणे सांगा" किंवा "सार्वजनिकपणे सांगा" (यु डी बी ) (पाहा: रूपक)

जे तुम्ही हळुवारपणे तुमच्या कानांत ऐकता

"मी जे तुम्हांला हळू आवाजांत सांगतो."

धाब्यावरून घोषित करा

"सर्वांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजांत बोला" किंवा." जेथे येशू राहत होता त्या घरावर गच्ची होती, आणि जे कोणी मोठ्या आवाजांत बोलत होते ते त्यांना दूरवर ऐकू जात असे.

Matthew 10:28

येशूने १०:१६ मध्ये त्याच्या शिष्यांना त्याच्यासाठी पुढे येणारा छळ सहन करावा लागेल हे सांगण्याचे सुरु केले होते ते तो चालू ठेवतो.

जे शरीराचा घात करितात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका

"लोकांना भिऊ नका. ते शरीराचा घात करतात परंतु ते आत्म्याचा घात करू शकत नाहीत."

शरीराचा घात करणे

शारीरिक मृत्यूस कारण होणे. हे जर शब्द बेढब आहेत तर त्यांचे असे भाषांतर होऊ शकते "तुम्हांला ठार मारतील" किंवा "दुसऱ्या लोकांना ठार मारतील"

शरीर

व्यक्तीचा भाग ज्याला स्पर्श केला जाऊ शकतो.

आत्म्याचा घात करणे

मेल्यानंतर लोकांना इजा करणे.

आत्मा

व्यक्तीचा तो भाग ज्याला स्पर्श केला जाऊ शकत नाही शारीरिक मृत्युनंतर जो जगत राहातो.

दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही

ह्या अलंकारयुक्त प्रश्नांचे असे भाषांतर होऊ शकत "चिमण्यांचा विचार करा. त्यांचे मोल फार कमी आहे तुम्ही दोन चिमण्या एका दमडीला विकत घेऊ शकता" (यु डी बी ) (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

चिमण्या

लोक ज्या गोष्टीं महत्वाच्या समजत नाहीत त्यांच्यासाठी बियांचे दाणे खाणारे हे अतिशय लहान पक्षी ह्यांचा रूपक म्हणून उपयोग केला गेला आहे. (पाहा: रूपक)

दमडी

लक्ष्य भाषेत ह्याचे नेहमी सर्वांत लहान नाणे म्हणून भाषांतर केले जाते. हे तांब्याच्या नाण्याचा उल्लेख करते जी एका मजुराला दिल्या जाणाऱ्या एका दिवसाच्या मजुरीचा सोळावा भाग आहे. ह्याचे असे देखील भाषांतर होऊ शकते "फार थोडे पैसे"

तुमच्या पित्यावांचून त्यांतून एकहि भूमीवर पडणार नाही

ह्या अभिव्यक्तीचे असे भाषांतर होऊ शकते "त्यातून एकहि तुमच्या पित्याला जर माहित असेल तरच भूमीवर पडते" किंवा "केवळ तुमच्या पित्याला त्याबद्दल माहित असले तरच त्यातून एक भूमीवर पडते" (पाहा: पर्यायोक्ती)

त्यातून एकहि

"एक चिमणी नाही"

भूमीवर पडते

"मरते"

तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत

"तुमच्या डोक्यावर किती केस आहते हे सुद्धा देवला माहित आहे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

गणती केली आहे

"मोजलेले आहेत"

पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे

"देव पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमची अधिक कदर करतो"

Matthew 10:32

येशूने १०:१६ मध्ये त्याच्या शिष्यांना त्याच्यासाठी पुढे येणारा छळ सहन करावा लागेल हे सांगण्याचे सुरु केले होते ते तो चालू ठेवतो.

जो कोणी माणसांसमोर मला पत्करील

"जो कोणी इतरांना सांगतो की तो माझा शिष्य आहे" किंवा "जो कोणी इतरांसमोर हे स्वीकारतो की तो माझ्याशी एकनिष्ठ आहे"

कबूल करणे

"स्वीकार करणे" (पाहा यु डी बी )

माणसांसमोर

"लोकांसमोर" किंवा "इतर लोकांसमोर"

माझा स्वर्गातील पिता

येशू येथे देव पित्याविषयी बोलत आहे.

जो कोणी माणसांसमोर मला नाकारील

"जो कोणी लोकांसमोर माझा त्याग करील" किंवा "जो कोणी लोकांसमोर माझा अस्वीकार करील"किंवा "जो कोणी तो माझा शिष्य आहे हे इतरांसमोर स्वीकारण्याचे नाकारतो" किंवा "तो माझ्याशी एकनिष्ठ आहे हे जर तो स्वीकारण्याचे नाकारतो."

Matthew 10:34

येशूने १०:१६ मध्ये त्याच्या शिष्यांना त्याच्यासाठी पुढे येणारा छळ सहन करावा लागेल हे सांगण्याचे सुरु केले होते ते तो चालू ठेवतो.

समजू नका

"असे वाटून घेऊ नका" किंवा "असा विचारच करू नका"

तरवार

हे रूपक कदाचित १) हिंसक मृत्यूचा उल्लेख करते (पाहा: रूपकामध्ये "फुली")

फूट

"वळविणे" किंवा "विभागाने" किंवा "वेगळे करणे"

बापाविरुद्ध माणूस

"बापाविरुद्ध मुलगा"

मनुष्याचे वैरी

"व्यक्तीचे वैरी" किंवा "व्यक्तीचे सर्वांत वाईट वैरी"

त्याच्या स्वत:च्याच घरचे लोक

"त्याच्या स्वत:च्या कुटुंबाचे सदस्य"

Matthew 10:37

येशूने १०:१६ मध्ये त्याच्या शिष्यांना त्याच्यासाठी पुढे येणारा छळ सहन करावा लागेल हे सांगण्याचे सुरु केले होते ते तो चालू ठेवतो.

जो प्रेम करतो....तो योग्य नाही

पर्यायी भाषांतर: "जे प्रेम करतात...ते योग्य नाहीत" किंवा "जर तुम्ही प्रेम करता...तर तुम्ही योग्य नाहो."

तो कोण

ह्याचे असे देखील भाषांतर होऊ शकते "जो कोणी" किंवा "कोणी एक" किंवा "कोणीहि" किंवा "जे लोक" (पाहा यु डी बी ).

प्रेम करतो

येथे "प्रेम" ह्यासाठी जो शब्द वापरला गेला आहे तो "बंधू प्रेमाचा उल्लेख करतो" किंवा "मित्राचे प्रेम." ह्याचे असेहि भाषांतर होऊ शकते "काळजी घेणे" किंवा "च्या प्रती एकनिष्ठ" किंवा "ची आवड असणे."

तो मला योग्य नाही

ह्याचे असे देखील भाषांतर होऊ शकते "माझा संबंधित असणे योग्य नाही" किंवा "तो माझा शिष्य होण्यांस योग्य नाही" किंवा "तो माझा होण्यांस योग्य नाही." (पाहा यु डी बी ).

जो कोणी उचलून घेत नाही....तो नाही

पर्यायी भाषांतर: "जे कोणी उचलून घे नाहीत....ते नाहीत" किंवा "जर तुम्ही उचलून घेत नाहीत...तर तुम्ही नाहीत" किंवा "जोपर्यंत तुम्ही उचलून घेत नाहीत....तुम्ही नाहीत."

वधस्तंभ.....उचलून घ्या आणि मागे या

मरण्यांस तयार असण्याचे हे रूपक आहे. कोठलीहि एक वस्तू घेऊन दुसऱ्या व्यक्तीच्या मागे जाणे ह्यासाठी नियमित शब्दांचा उपयोग करा. (पाहा: रूपक).

उचलून घ्या

"उचलून घेणे" किंवा "उचलून घेऊन जाणे"

जो कोणी राखतो....तो गमावील....जो कोणी गमावितो तो राखील

ह्या शब्दांचे भाषांतर शक्यतो थोडक्या शब्दांत करावे. पर्यायी भाषांतर: "जे कोणी राखतील....ते गमावितील....जे कोणी गमावितील....ते राखतील" किंवा "जर तुम्ही राखाल.....तुम्ही गमवाल....जर तुम्ही गमवाल....तुम्ही राखाल."

राखतो

हे "ठेवतो" किंवा "जतन करतो" ह्यासाठी सामीप्यमुलक लक्षणा आहे. पर्यायी भाषांतर: "ठेवण्याचा प्रयत्न करतो" किंवा "जतन करण्याचा प्रयत्न करतो." (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

गमाविल

व्यक्ती मरेल असा ह्याचा अर्थ नाही. हे "त्याला खरे जीवन प्राप्त होणार नाही" ह्याचे रूपक आहे. (पाहा: रूपक)

गमावतो

पर्यायी भाषांतर: "सोडून देतो" किंवा "सोडून देण्यांस तयार असतो."

माझ्याकरिता

"कारण तो माझ्यावर विश्वास करतो" (पाहा यु डी बी ) किंवा "माझ्याखातर" किंवा "माझ्यामुळे." जशी १०:१८ मध्ये आहे तशीच येथे तीच कल्पना आहे "माझ्यामुळे"

तो राखील

ह्या रूपकाचा अर्थ आहे खरे जीवन त्याला प्राप्त होईल." (पाहा: रूपक)

Matthew 10:40

ते जात असता जे लोक त्यांना मदत करतील त्यांना तो त्याचे प्रतिफळ देईल असे येशू त्याच्या प्रेषितांना स्पष्ट करून सांगण्यांस सुरूवात करीत आहे.

जो

ह्याचे असेहि भाषांतर केले जाऊ शकते: "जो कोणी" किंवा कोणीहि" किंवा "कोणी एक" (पाहा यु डी बी )

स्वागत करतो

१०:१४ ह्यामध्ये जो शब्द आहे तसाच तोच शब्द आहे "स्वीकारतो" आणि म्हणजे "पाहुणा म्हणून स्वीकारणे." # तुम्ही

"तुम्ही" हे सर्वनाम येशू ज्या बारा प्रेषिताशी बोलत आहे त्याना दर्शविते

मला पाठविले त्याचे स्वागत करतो

"ज्याने मला पाठविले त्या देव पित्याला स्वीकारतो"

Matthew 10:42

ते जात असता जे लोक त्यांना मदत करतील त्यांना तो त्याचे प्रतिफळ देईल असे येशू त्याच्या प्रेषितांना स्पष्ट करून सांगण्याचे समाप्त करतो.

जो कोणी देईल

"कोणीहि जो देईल"

ह्या बिनमहत्वाच्या लोकांपैकी एकाला, कारण तो शिष्य म्हणून, पिण्यासाठी गार पाण्याचा प्याला देतो

ह्याचे असे भाषांतर केले जाऊ शकते "ह्या लहानातील एकाला तो माझा शिष्य आहे म्हणून गार पाण्याचा एक प्याला" किंवा "माझ्या शिष्यांतील लहानांत लहानाला फक्त गार पाण्याचा एक प्याला."

तो आपल्या प्रतीफळास मुकणारच नाही

"त्या व्यक्तीला नक्कीच त्याचे प्रतिफळ मिळेल" (पाहा: पर्यायोक्ती)

मुकणे

"नकार दिला जाऊ शकतो" मालमत्ता किंवा वतन काढून घेतले जाणे श्याच्याशी कांहीच संबध नाही.