Matthew 3

Matthew 3:1

हा विभाग पुष्कळ वर्षानंतर घडतो जेव्हा याऱ्य बाप्तिस्मा करणारा योहान हा प्रौढ होतो आणि प्रचार करण्यांस सुरू करतो.

त्याच्याचविषयी

"त्याच्याच" हे सर्वनाम बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा उल्लेख करते.

त्याच्याचविषयी यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की

पर्यायी भाषांतर: "जेव्हा त्याने सांगितले तेव्हा तो बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाबद्दल बोलत होता." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

परमेश्वराचा मार्ग सिध्द करा; त्याच्या वाटा नीट करा

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या संदेशाचे हे रूपक आहे जो लोकांना पश्चात्ताप करण्यासाठी तयार करीत होता (पाहा: रूपक). पर्यायी भाषांतर: "तुमच्या जीवन शैलीला बदलण्यांस तयार व्हा म्हणजे तुमचे जीवन देवाला प्रसन्न करील."

Matthew 3:4

बाप्तिस्मा करणारा योहान प्रचार करणे चालू ठेवतो.

त्यांना त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला

"योहानाने त्यांना बाप्तिस्मा दिला" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ते

यरुशलेम, यहूदीया, यार्देन नदीच्या आसपासच्या अवघ्या प्रदेशातून लोक येत होते.

Matthew 3:7

भावी क्रोधापासून पाळावयास तुम्हांला कोणी सावध केले

                                   #  जे तुम्ही विषारी सांपाची संतती 

ह्या रूपकाच्या

विषयी साप हे धोकादायक आणि वाईटाचेप्रतीक आहे, पर्यायी भाषांतर "तुम्ही वाईट विषार सापानों!" किंवा "तुम्ही त्या विषारी रापासारखे वाईट असे आहात. # ह्या अलंकारयुक्त प्रश्नासह योहान लोकांची खरडपट्टी काढीत आहे कारण देवाने त्यांना शिक्षा देऊ नये म्हणून ते त्याला बाप्तिस्मा देण्यांस सांगत होते परंतु पाप न करण्याची त्यांची इच्छा नव्हती. "अशाप्रकारे तुम्ही देवाच्या क्रोधापासून पळू शकत नाही" किंवा "केवळ बाप्तिस्मा घेण्याद्वारे तुम्ही देवाच्या क्रोधापासून पळू शकता असे समजू नका" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

येणाऱ्या क्रोधापासून

पर्यायी भाषांतर: "येणाऱ्या शिक्षेपासून" किंवा "कारवाई करणाऱ्या देवाच्या क्रोधापासून" किंवा "कारण देव तुम्हांला शिक्षा करणार होता." "क्रोध" हा शब्द देवाचं शिक्षेचा संदर्भ देण्यासाठी उपयोगांत आणला जातो कारण शिक्षेच्या अगोदर क्रोध येतो (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

अब्राहाम आमचा बाप आहे

"अब्राहाम आमचा पूर्वज आहे" किंवा "आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत"

ह्या दगडांपासून अब्राहामासाठी मुलें निर्माण करण्यास देव समर्थ आहे

"देव ह्या दगडांपासून सुद्धा शारीरिक वंशज तयार करू शकतो आणि ते अब्राहामाला देऊ शकतो"

Matthew 3:10

बाप्तिस्मा करणारा योहान प्रचार करणे चालू ठेवतो.

आताच तर झाडाच्या मुळाशी कु

हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकिले जाईल

हे रूपक आहे ज्याचा अर्थ "तुम्ही जर तुमच्या पापयुक्त वर्तनापासून मागे फिरत नाही तर देव तुम्हांला शिक्षा देण्यांस तयार आहे जसा एखादा मनुष्य त्याची कु

हाड जे झाड फळ देत नाही त्याला तोडून टाकण्यासाठी त्याच्या मुळाशी ठेवतो." (पाहा: रूपक)

मी तुमचा बाप्तिस्मा करतो

जे पश्चात्ताप करतात त्यांचा योहान बाप्तिस्मा करीत होता.

परंतु माझ्या मागून जो येत आहे तो

योहानाच्या मागून येणारा व्यक्ती येशूच होता.

तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील

हे रूपक आहे ज्याचा अर्थ, "देव त्याचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये टाकील आणि जे देवाच्या राज्यांत प्रवेश करतील त्त्यांचा न्याय करण्यासाठी व त्यांना शुद्ध करण्यासाठी तुम्हांला अग्नीतून घेऊन जाईल." (पाहा: रुपक)

तो तुमचा बाप्तिस्मा करील

येशू तुमचा बाप्तिस्मा करील.

त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील

हे रूपक आहे जे जो मनुष्य भूसा गव्हापासून जसा वेगळा करतो त्याप्रमाणे ख्रिस्त नीतिमान लोकांना अनीतिमान लोकांपासून वेगळे करील. जोडणीला स्पष्ट करण्यासाठी ह्याचे उपमा म्हणून भाषांतर केले जाऊ शकते; "ज्याच्या हातात त्याचे सूप आहे त्या माणसासारखा ख्रिस्त आहे." (पाहा: उपमा)

त्याचे सूप त्याच्या हातात आहे

पर्यायी भाषांतर: "ख्रिस्ताने सूप हातात घेतले आहे कारण तो तयार आहे."

सूप

गव्हाच्या दाण्यांना वर हवेमध्ये फेकून गव्हापासून भूसा वेगळा करण्याचे हे एक साधन आहे. जड गहू परत खाली सूपांत पडतात आणि भूसा हवेने उडून जातो. हे खुरट्या सारखेच आहे.

त्याचे खळे

हीच ती जागा आहे जेथे लोक गव्हाला भूश्यापासून वेगळे करतात. पर्यायी भाषांतर: "त्याची जमीन" किंवा "ती जमीन जेथे गव्हाला भूश्यापासून वेगळे केले जाते."

त्याचे गहू कोठारांत सांठवील...व भूसा न वित्या अग्नीने जाळून टाकील

हे रूपक आहे जे हे दाखविते की देव नीतिमान लोकांना दुष्ट लोकांपासून कसे वेगळे करील. जसा शेतकरी गव्हाला त्याच्या कोठारांत सांठवितो तसा देव नीतिमान लोकांना स्वर्गांत पाठवील, आणि देव जे लोक भूश्यासारखे आहेत त्यांना न विझत्या अग्नीने जाळून टाकील. (पाहा: रूपक)

Matthew 3:13

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूला कसा बाप्तिस्मा दिला ह्या वृत्तांताची येथे सुरूवात होते.

मी आपल्या हातून बाप्तिस्मा घ्यावा

"मी" हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा उल्लेख करतो तर "आपल्या" हा शब्द येशू ख्रिस्ताचा उल्लेख करतो.

आपण माझ्याकडे येता हे काय?

हा अलंकारयुक्त प्रश्न आहे. पर्यायी भाषांतर: "तुम्ही पापी नाहीत म्हणून तुम्ही माझ्याकडे येऊ नये व मी तुम्हांला बाप्तिस्मा देऊ नये." हे लक्षांत घ्या की "तुम्ही" हा शब्द येशू ख्रिस्ताचा उल्लेख करतो तर "मी" हा शब्द बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा उल्लेख करतो. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

Matthew 3:16

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूला कसा बाप्तिस्मा दिला हा वृत्तांत पुढे चालू

त्याला बाप्तिस्मा दिल्यावर

ह्याचे अशाप्रकारे भाषांतर केले जाऊ शकते की, "योहानाने येशूला बाप्तिस्मा दिल्यानंतर."

स्वर्ग त्याच्यासाठी उघडली

पर्यायी भाषांतर: "आकाश उघडलेले त्याने पाहिले" किंवा "स्वर्ग उघडलेली त्याने पाहिली" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

कबूतरासारखा खाली उतरतांना

१) हे साधे विधान असू शकते जसे आत्मा कबुतराच्या रूपांत होता (पाहा: यु डी बी ) किंवा २) उपमा असू शकते ज्याची तुलना जसा एक कबूतर सैम्यपणे उतरतो त्याप्रमाणे सैम्यपणे आत्मा येशूवर उतरतो. (पाहा: उपमा)

पाहा

हे मोठ्या कथेच्या दुसऱ्या घटनेच्या सुरूवातीस चिन्हांकित करते. ह्यांत पूर्वीच्या घटनेपेक्षा वेगळ्या लोकांचा समावेश असू शकतो. तुमच्या भाषेत असे करण्याचा प्रबंध असू शकतो.