Matthew 3

मत्तय 03 सामान्य नोंदी

रचना आणि स्वरूप

काही भाषांतरे जुन्या करारातील मजकुराचा उपयोग उरलेल्या मजकुरापेक्षा पानाच्या उजवीकडे ठेवतात. यूएलटी हे वचन 3 मधील घेण्यात आलेल्या सामग्रीसह करतात.

या अध्यातील विशेष संकल्पना

“पश्चातापास योग्य फळ द्या”

फळ हे शास्त्रवचनामध्ये सामान्य शब्द चित्र आहे. लेखक याचा वापर चांगल्या किंवा वाईट वर्तनाचे परिणाम वर्णन करण्यासाठी करतात. या अध्यायामध्ये चांगले फळ देवाच्या आज्ञा म्हणून देणारे परिणाम आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tw?section=other#fruit)

या अध्यायात आणखी संभाव्य भाषांतरातील अडचणी

“स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे”

हे कोणालाच ठाऊक नाही की “स्वर्गाचे राज्य’ अस्तित्वात किंवा जेव्हा योहानाने हे शब्द उच्चारले तेव्हा अजूनही येत आहे. इंग्रजी भाषांतरामध्ये “हाताशी आहे” या वाक्याशाचा वापर करतात परंतु हे शब्द भाषांतर करणे अवघड असू शकतात. इतर आवृत्यामध्ये “जवळ आले आहे” किंवा “जवळ येत आहे” असा वापर करतात.

Matthew 3:1

General Information:

ही गोष्टीच्या नवीन भागाची सुरवात आहे जेथे मत्तय बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या सेवेविषयी सांगत आहे. अध्याय 3 मध्ये मत्तयने यशया संदेष्ट्याद्वारे लिहिलेली वचने वापरली आहेत की बाप्तिस्मा करणारा योहान येशूच्या सेवाकार्यासाठी तयार केलेला संदेशवाहक होता.

In those days

हे पुष्कळ वर्षा नंतर योसेफ आणि मरीया मिसर देश सोडून नासरेथला गेले. येशू कदाचित आपली सेवा सुरु करण्याच्या अगदी जवळ आहे. वैकल्पिक भाषांतर: “काही काळानंतर” किंवा “काही वर्षानंतर”

Matthew 3:2

Repent

हे अनेकवचन आहे. योहान लोकांशी बोलत आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

the kingdom of heaven is near

वाक्य “स्वर्गाचे राज्य” हे परमेश्वर शासन करणारा आहे याचा उल्लेख करते. हे वाक्य केवळ मत्तयच्या पुस्तकात आहे. शक्य असल्यास, आपल्या भाषेत “स्वर्ग” हा शब्द वापरा. वैकल्पिक भाषांतर: “स्वर्गात आपला देव लवकरच स्वतःला राजा असल्याचे दर्शवेल” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

Matthew 3:3

For this is he who was spoken of by Isaiah the prophet, saying

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जेव्हा यशया संदेष्ठा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी बोलत होता तेव्हा तो म्हणाला” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

The voice of one calling out in the wilderness

हे एक वाक्य म्हणून व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “अरण्यात ओरडणाऱ्याचा आवाज ऐकला “ किंवा “अरण्यात ओरडणाऱ्या कोणा एकाचा आवाज त्यांनी ऐकला”

Make ready the way of the Lord ... make his paths straight

या दोन वाक्यांचा अर्थ एकच आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-parallelism)

Make ready the way of the Lord

प्रभूसाठी मार्ग तयार करा. हे केल्याने प्रभूचा संदेश ऐकण्यास तयार असल्याचे दर्शवते. लोक त्यांच्या पापाबद्दल पश्चाताप करून असे करतात. वैकल्पिक भाषांतर: “जेव्हा तो येईल तेव्हा प्रभूचा संदेश ऐकण्यास तयार राहा” किंवा “पश्चाताप करा” आणि प्रभूच्या येण्यास तयार राहा” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

Matthew 3:4

Now ... wild honey

मुख्य कथेच्या ओळीमध्ये खंड चिन्हांकित करण्यासाठी “आता” हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी माहिती सांगतो. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#writing-background)

wore clothing of camel's hair and a leather belt around his waist

या कपड्यांचे प्रतिक आहे की योहान फार पूर्वीपासून संदेष्ट्या प्रमाणेच संदेष्टा होता, विशेषतः एलीया संदेष्टा. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-symaction आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

Matthew 3:5

Then Jerusalem, all Judea, and all the region

“यरुशलेम”, “यहूदिया” आणि “क्षेत्र “ हे त्या भागातील लोकांसाठी वापरलेली शब्दप्रणाली आहे. शब्द “सर्व” हा बहुतेक लोक बाहेर पडले यावर जोर देण्यासाठी एक अतिशयोक्ती आहे. वैकल्पिक भाषांतर: “मग कदाचित “यरुशलेम”, यहूदिया” आणि त्या भागातील लोक “(पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-hyperbole)

Matthew 3:6

They were baptized by him

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “योहानाने त्यांना बाप्तिस्मा दिला” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

They

हे यरुशलेम, यहूदिया आणि यार्देन नदीच्या आसपासच्या क्षेत्रातील येणाऱ्या लोकांशी संबंधित आहे.

Matthew 3:7

General Information:

बाप्तिस्मा करणारा योहान सदुकी आणि परुशी यांना दोष देण्यास प्रारंभ करतो.

You offspring of vipers, who

हे एक रूपक आहे. येथे “संतती” म्हणजे एक प्रकारचा विषारी साप आहे आणि ते वाईटाचे प्रतिनिधित्व करतात. हे एक वेगळे वाक्य म्हणून नमूद असावे. वैकल्पिक भाषांतर: “तूम्ही दुष्ट विषारी सापांनो! कोण” किंवा “तूम्ही विषारी सापासारखे आहात! कोण” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

who warned you to flee from the wrath that is coming?

परुशी व सदुकी यांना दोष देण्यास योहानाने एक प्रश्न केला कारण ते त्याला बाप्तिस्मा देण्यास सांगत होते जेणेकरून देव त्यांना शिक्षा करणार नाही, परंतु ते पाप करणे थांबवू इच्छित नव्हते. वैकल्पिक भाषांतर: “आपण यासारखे देवाच्या क्रोधापासून पळून जाऊ शकत नाही”. किंवा “मी तुम्हास बाप्तिस्मा देत आहे म्हणूनच देवाच्या क्रोधापासून तूम्ही पळून जाऊ शकता असा विचार करू नका.” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion)

flee from the wrath that is coming

देवाच्या क्रोधाचा उल्लेख करण्यासाठी “क्रोध”हा शब्द वापरला आहे कारण त्याचा क्रोध त्यापूर्वी होता. वैकल्पिक भाषांतर: “येणाऱ्या शिक्षेपासून दूर पळा” किंवा “बचाव करा कारण देव तुम्हास शिक्षा करणार आहे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

Matthew 3:8

Bear fruit worthy of repentance

“फळ द्या” हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या कृत्यांचा संदर्भ करणारे रूपक आहे. वैकल्पिक भाषांतर: “तुमची कृती दाखवते की तूम्ही खरोखर पश्चाताप केला आहे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

Matthew 3:9

We have Abraham for our father

अब्राहाम आपला पूर्वज आहे किंवा “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत.” यहूदी पुढाऱ्यांनी असा विचार केला की ते अब्राहामाचे वंशज आहेत म्हणून देव त्यांना शिक्षा करणार नाही. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

For I say to you

योहान जे बोलणार होता त्यावर हे जोर देते.

God is able to raise up children for Abraham even out of these stones

देव या खडकातूनही शारीरिक वंशज निर्माण करू शकतो आणि अब्राहामाला देऊ शकतो

Matthew 3:10

Connecting Statement:

बाप्तिस्मा करणारा योहान सदुकी आणि परुशी यांना दोष देतच राहतो.

Already the ax has been placed against the root of the trees. So every tree that does not produce good fruit is chopped down and thrown into the fire

या रूपकाचा अर्थ देव पापी लोकास शिक्षा करण्यास तयार आहे. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “परमेश्वराकडे त्याची कुऱ्हाड आहे आणि तो वाईट फळ देणारे कोणतेही वृक्ष तोडण्यास व त्यास जाळून टाकण्यासाठी तयार आहे” किंवा “एखादा व्यक्ती आपली कुऱ्हाड घेऊन वाईट फळ देणाऱ्या झाडाला कापून टाकण्यास तयार आहे, तुम्हाला तुमच्या पापाबद्दल शिक्षा देण्यास देव तयार आहे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 3:11

for repentance

तूम्ही पश्चाताप केला आहे हे दर्शवण्यासाठी

But he who comes after me

योहाना नंतर येणारा व्यक्ती येशू आहे.

is mightier than I

माझ्यापेक्षा अधिक महत्वाचा आहे

He will baptize you with the Holy Spirit and with fire

हे रूपक योहानाच्या पाण्याच्या बाप्तिस्म्याचे भविष्यातील अग्नीच्या बाप्तिस्म्याशी तुलना करते. याचा अर्थ योहानाचा बाप्तिस्मा केवळ प्रतीकात्मक त्यांच्या पापांना शुद्ध करतो. पवित्र आत्म्याद्वारे आणि अग्नीद्वारे बाप्तिस्मा घेण्याने लोक त्यांच्या पापापासून शुद्ध होतील. शक्य असेल तर, आपल्या भाषेत योहानाच्या बाप्तिस्म्याची तुलना करण्यसाठी “बाप्तिस्मा” हा शब्द वापरा. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

Matthew 3:12

His winnowing fork is in his hand to thoroughly clear off his threshing floor

हे रूपक नीतिमान लोकांना ख्रिस्त दुष्ट लोकांपासून वेगळे करेल अशा पद्धतीने जसा एक मनुष्य गव्हाचा दाना भूसातून वेगळा करतो अशी तुलना. वैकल्पिक भाषांतर: “ख्रिस्त हा एक असा मनुष्य आहे ज्याच्या हातात त्याचे सूप आहे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

His winnowing fork is in his hand

येथे “त्याच्या हातात” म्हणजे व्यक्ती कार्य करण्यास तयार आहे . वैकल्पिक भाषांतर: “ख्रिस्ताच्या हातात त्याचे सूप आहे कारण तो तयार आहे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-idiom)

winnowing fork

गहू हवेत फेकून भूसा आणि गहू वेगवेगळे करण्याचे हे एक साधन आहे. धान्य परत खाली येते आणि वाऱ्याने भूस फेकली जाते. ते खुरट्याच्या आकारा सारखे असते पण लहान पातळ लाकडापासून बनलेले असते. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-unknown)

to thoroughly clear off his threshing floor

ख्रिस्त हा हातामध्ये सूप असणाऱ्या माणसासारखा आहे जो आपले खळे साफ करण्यास तयार आहे.

his threshing floor

त्याची जमीन किंवा “ती जागा जेथे तो धान्य आणि भूसा वेगळा करील”

gather his wheat into the storehouse ... burn up the chaff with fire that can never be put

परमेश्वर कसे धार्मिक लोकांना वाईट लोकापासून वेगळे करेल हे ते दाखवण्याचे एक रूपक आहे. धार्मिक शेतकऱ्याच्या भांडारातील गव्हासारखे स्वर्गात जातील, आणि जे लोक भुसासारखे आहेत त्यांना न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकील. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

can never be put out

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “कधीही जळून जाणार नाही” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 3:13

Connecting Statement:

जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला तेव्हा येथे दृश्य नंतरच्या काळात बदलले.

to be baptized by John

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “योहान त्याला बाप्तिस्मा देऊ शकेल” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 3:14

I need to be baptized by you, and do you come to me?

येशूने केलेल्या विनंती बद्दल योहानाला आश्चर्य वाटले हे दर्शवण्यासाठी योहान एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक भाषांतर: “आपण माझ्यापेक्षा अधिक महत्वाचे आहात. मी तुम्हाला बाप्तिस्मा देऊ नये. आपण मला बाप्तिस्मा दिला पाहिजे.” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion)

Matthew 3:15

for us

येथे “आम्ही” येशू आणि योहानाला दर्शवते. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-inclusive)

Matthew 3:16

Connecting Statement:

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या गोष्टीच्या भागाचा हा शेवट आहे. जेव्हा त्याने येशूला बाप्तिस्मा दिला तेव्हा काय घडले याचे वर्णन करते.

After he was baptized

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “योहानाने येशूला बाप्तिस्मा दिल्यानंतर” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

behold

येथे “पाहणे” हा शब्द आपल्याला खालील आश्चर्यकारक माहितीकडे लक्ष देण्याची सूचना देतो.

the heavens were opened to him

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “येशूने स्वर्ग उघडलेला पहिला” किंवा “देवाने येशूसाठी स्वर्गास उघडले” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

coming down like a dove

संभाव्य अर्थ म्हणजे 1) हे केवळ एक वाक्य आहे की आत्मा कबुतराच्या स्वरुपात आहे किंवा 2) ही एक अशी कल्पना आहे जिच्यामध्ये आत्मा कबुताराप्रमाणे येशूवर येत आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-simile)

Matthew 3:17

a voice came out of the heavens saying

येशूने स्वर्गातून आवाज ऐकला. येथे “आवाज” म्हणजे देव बोलत आहे. वैकल्पिक भाषांतर: “देव स्वर्गातून बोलला” (पहा : /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

Son

हे येशूसाठी महत्वाचे शीर्षक आहे जे देवाशी त्याच्या नातेसंबंधांचे वर्णन करते. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#guidelines-sonofgodprinciples)